सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा
By Admin | Updated: May 14, 2014 00:40 IST2014-05-14T00:38:33+5:302014-05-14T00:40:16+5:30
पूर्णा : तालुक्यातील कावलगाव येथे १५ मे रोजी दुपारी १२.५१ वाजता अहिल्यादेवी होळकर मंगल कार्यालयात सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा
पूर्णा : तालुक्यातील कावलगाव येथे १५ मे रोजी दुपारी १२.५१ वाजता अहिल्यादेवी होळकर मंगल कार्यालयात सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परपंरा, हुंडाबंदी असे आहे. या विवाह सोहळ्यात वर-वधू यांना कपडे व मंगळसूत्र संयोजकांच्या वतीने देण्यात येतील. सर्व जाती-धर्माचे विवाह एकाच मंडपात लावण्यात येतात. समाजप्रबोधनाचे काम असलेल्या या विवाह सोहळ्यात यावर्षी १४ जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. संयोजक मारोतराव पिसाळ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. विवाह सोहळ्यात त्यांचादेखील सत्कार करण्यात येणार आहे. या शिवाय संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव जाधव, उपाध्यक्ष मुरलीधर गोडबोले यांचाही सत्कार करण्यात येणार असून प्रा. सुषमा अंधारे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन समता मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे. यशस्वीतेसाठी संयोजक परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)