शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अग्नीकांडाचे रहस्य गुलदस्त्यात

By admin | Updated: September 18, 2014 00:40 IST

अंबाजोगाई: येथील नवा मोंढा परिसरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी सहा दुकाने फोडून रोख रक्कम व ऐवजाची लूट केली तसेच दुकानांना आग लावून चोरटे फरार झाले.

अंबाजोगाई: येथील नवा मोंढा परिसरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी सहा दुकाने फोडून रोख रक्कम व ऐवजाची लूट केली तसेच दुकानांना आग लावून चोरटे फरार झाले. या आगीत सहा दुकाने भस्मसात झाली. नुकसानीचा आकडा सात लाखांवर जाऊन पोहचला आहे. ही आग कोणी व कशासाठी लावली? याचे रहस्य अजून उलगडले नसले तरी पोलिस यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. मात्र, कोट्यवधी रुपयांचे दररोज व्यवहार होणाऱ्या मोंढा बाजारपेठेत सुरक्षिततेच्या बाबतीत मात्र व्यापाऱ्यांमध्ये कमालीची अनास्था आहे. अंबाजोगाईची मुख्य बाजारपेठ असलेल्या नवा मोंढा हा परिसर सातत्याने चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मोंढा परिसरात लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण सातत्याने सुरूच आहेत. मोंढयातील ४० टक्के व्यापाऱ्यांना आजपर्यंत चोरी व दुकानफोडीचा सामना करावा लागला आहे. मोंढा बाजारपेठेत दररोज कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होतात. शहरातील सर्वच मोठ्या व्यापाऱ्यांची मोंढा परिसरात दुकाने व एजन्सीज् आहेत. अशी मोठी उलाढाल असतांनाही सुरक्षिततेच्या बाबतीत मात्र व्यापाऱ्यांमध्ये कमालीची अनास्था आहे. संपूर्ण मोंढयात स्वत:चे सुरक्षारक्षक ठेवण्याची तसदी कुणीही घेत नाही.परिणामी याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अशा स्थितीत सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना आखण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या आगीचे रहस्य अद्याप गुलदस्त्यात असले तरी याचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहेत. (वार्ताहर)