माध्यमिक, निरंतरला मिळाले शिक्षणाधिकारी
By Admin | Updated: July 3, 2016 00:36 IST2016-07-02T23:58:23+5:302016-07-03T00:36:17+5:30
बीड : शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी पदोन्नतीवर शिक्षणाधिकाऱ्यांची रिक्त पदे भारली. जि.प. च्या माध्यमिक शिक्षण विभागासह निरंतर विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाले आहेत.

माध्यमिक, निरंतरला मिळाले शिक्षणाधिकारी
बीड : शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी पदोन्नतीवर शिक्षणाधिकाऱ्यांची रिक्त पदे भारली. जि.प. च्या माध्यमिक शिक्षण विभागासह निरंतर विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाले आहेत.
सी. व्ही. देशमुख हे निरंतर शिक्षण विभागाला येत आहेत तर माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून व्ही. के. गोरडे यांच्या नावाने आदेश निघाले आहेत. निरंतर विभाग दोन वर्षांपासून तर माध्यमिक शिक्षण विभाग वर्षापासून प्रभारींवर होता. पूर्णवेळ अधिकारी नसल्याने निर्णय प्रक्रियेसही अडथळे येत होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी भार उपशिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल तर निरंतरचा कार्यभार शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता विक्रम सारुक यांच्याकडे होता. जैस्वाल रजेवर गेल्याने माध्यमिकची धुरा शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर यांच्याकडेच आली होती. एकाचवेळी दोन पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. नवे अधिकारी लवकरच रुजू होणार आहेत. (प्रतिनिधी)