दुसऱ्या टप्प्यात ४८ टन कचऱ्याची विल्हेवाट
By Admin | Updated: December 19, 2014 00:55 IST2014-12-19T00:39:53+5:302014-12-19T00:55:09+5:30
जालना : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत नगरपालिकेच्या वतीने गुरूवारी शहरातील झोन क्रमांक सदर बाजार २ मध्ये स्वच्छता मोहीम राबवून एकाच दिवशी

दुसऱ्या टप्प्यात ४८ टन कचऱ्याची विल्हेवाट
जालना : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत नगरपालिकेच्या वतीने गुरूवारी शहरातील झोन क्रमांक सदर बाजार २ मध्ये स्वच्छता मोहीम राबवून एकाच दिवशी ४८ टन कचरा उचलून तो सारवाडी रोडवरील डंपिंग ग्राऊंडवर नेऊन टाकण्यात आला.
या विशेष मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सकाळी ६ वाजता करण्यात आली. सदर बाजार २ मधील कन्हैय्यानगर ते आंबेडकर पुतळापर्यंत ते नदीपर्यंत दोन्ही भागात पूर्ण परिसरात ५३ कर्मचाऱ्यांनी ही सफाई केली. हनुमानघाट, डॉ. कोरडे यांचा दवाखाना ते हनुमान मंदिर या भागात २९ कर्मचाऱ्यांनी सफाई केली. लालबाग भागात हेमराज भुरेवाल यांचे घर ते चौकापर्यंत, समाजमंदिर ते डॉ. आंबेडकर पुतळा परिसर, लालबाग बुद्ध विहार परिसर येथे ३० कर्मचाऱ्यानी तर कन्हैय्यानगर माऊली हॉटेल ते नदीपर्यंत दोन्ही बाजूच्या नाल्या, कन्हैय्यानगर चौफुली ते मोंढा बायपास, कन्हैय्यानगर चौफुली ते काळे चौक या भागात ४८ कर्मचाऱ्यांनी सफाई केली.
दादावाडी परिसर, बुद्ध विहार, खांडसरी येथील नाल्या, अजिंठानगर, मूर्गीतलाव ते काळे चौकापर्यंत ४६ कर्मचाऱ्यांनी सफाईचे काम केले. पांजरापोळ ते भगतसिंग चौक, मूर्गीतलाव राम कांबळे यांचे घर ते रामदास ससाणे यांच्या घरापर्यंतचा पूर्ण परिसर, सूर्या हॉटेल ते भगतसिंग चौक या भागात ३८ कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली. (प्रतिनिधी)४
या मोहिमेमध्ये एकूण १९ जवान, १२ वाहनचालक, पुरूष कामगार ११२, स्त्री कामगार १०१, खाजगी कामगार २५ असे २६९ कर्मचारी कार्यरत होते. या मोहिमेमध्ये मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, उपमुख्याधिकारी कक़ा. मुखेडकर, स्वच्छता निरीक्षक पंडित पवार, संजय खर्डेकर, राजू मोरे, कारभारी तायडे, अशोक लोंढे, श्यामसन कसबे हे उपस्थित होते.