वाळूमाफियांवर दुसऱ्यांदा कारवाई
By Admin | Updated: July 3, 2017 23:45 IST2017-07-03T23:43:36+5:302017-07-03T23:45:04+5:30
बीड : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे पाच टिप्पर रविवारी रात्री पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पकडले.

वाळूमाफियांवर दुसऱ्यांदा कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे पाच टिप्पर रविवारी रात्री पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पकडले. त्यांच्याकडून ७८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहा दिवसांत याच परिसरात ही दुसरी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
पिंपळनेर परिसरातून मागील काही दिवसांपासून बेकायदेशीररीत्या अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी रविवारी रात्री छापा टाकून वाळू वाहतूक करणारे ५ टिप्पर पकडले, तसेच ७८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाच आरोपींना पकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख कैलास लहाने, गणेश पवार, शिवदास घोलप, अनंत गिरी, संजय चव्हाण, प्रवीण कुडके यांनी केली.