दुसऱ्या भावानेही सोडले प्राण

By Admin | Updated: August 25, 2016 01:03 IST2016-08-25T00:39:39+5:302016-08-25T01:03:37+5:30

तलवाडा : गेवराई तालुक्यातील काठोडा येथे दारुड्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून दोन भावंडांनी विषारी द्रव घेतले होते. स्वाभिमान गणकवार याचा मंगळवारी मृत्यू झाला होता.

The second brother also left the Prana | दुसऱ्या भावानेही सोडले प्राण

दुसऱ्या भावानेही सोडले प्राण


तलवाडा : गेवराई तालुक्यातील काठोडा येथे दारुड्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून दोन भावंडांनी विषारी द्रव घेतले होते. स्वाभिमान गणकवार याचा मंगळवारी मृत्यू झाला होता. बुधवारी धम्मपाल गणकवार (१६) यानेही प्राण सोडले.
अर्जुन गणकवार हे अल्पभूधारक असून मोलमजुरी करतात. दारू पिऊन ते पत्नी गंगाला मारहाण करत. अर्जुन यांना तीन मुले असून त्यापैकी स्वाभिमान व धम्मपाल यांना ही बाब खटकत होती. यापैकी स्वाभिमान जेसीबवर चालक म्हणून तर धम्मपाल हॉटेलात वेटर म्हणून काम करायचा. त्यांनी जाब विचारल्यानंतर वडिलांनी त्या दोघांना मारहाण केली होती. त्यानंतर सोमवारी या दोघांनीही विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांवरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. २४ तासांच्या फरकाने दोघांचीही प्राणज्योत मालवली. (वार्ताहर)

Web Title: The second brother also left the Prana