अनेक महिन्यानंतर मिळाली रेशनची साखर
By Admin | Updated: August 10, 2014 00:09 IST2014-08-09T23:37:52+5:302014-08-10T00:09:59+5:30
परभणी : जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांसाठी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रेशनची साखर उपलब्ध झाली असून, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना या साखरेचे वितरण होणार आहे.

अनेक महिन्यानंतर मिळाली रेशनची साखर
परभणी : जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांसाठी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रेशनची साखर उपलब्ध झाली असून, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना या साखरेचे वितरण होणार आहे. त्यामुळे गोरगरीबांचे सणवार गोड होणार आहेत.
दारिद्र्य रेषेखालील व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मुलबक दरात उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शासनाकडून स्वस्त धान्य वितरण प्रणाली राबविली जाते. या योजनेअंतर्गत गहू, तांदूळ, तेल, साखर आदी जीवनावश्यक वस्तू अल्पदरात उपलब्ध करून दिल्या जातात़ गहू, तांदूळ या वस्तू स्वस्तधान्य दुकानामार्फत लाभधारकांना मिळत होत्या़ परंतु, मागील काही महिन्यांपासून साखर उपलब्ध होत नव्हती़ परिणामी गोरगरीब नागरिकांना खुल्या बाजारातून साखर विकत घ्यावी लागत असे़ जुलै महिन्याचे साखरेचे नियतनन जिल्ह्याला मंजूर झाले आहे़ २०२० क्विंटल साखर जिल्ह्यासाठी उपलब्ध झाली आहे़ श्रावण महिना सुरू झाला की सणवारांना प्रारंभ होतो़ आगामी काळात गणेशोत्सव, महालक्ष्मी, दुर्गोत्सव असे विविध सण आहेत़ या काळात गोडधोड करण्यासाठी साखरेची नितांत आवश्यकता असते़ खुल्या बाजारात ही साखर ३२ रुपये किलो दराने मिळते आणि स्वस्तधान्य दुकानात मात्र हीच साखर १३ रुपये ५० पैसे प्रतिकिलो या दराने लाभधारकांना मिळते़ जुलै महिन्यासाठी जिल्ह्यात साखर उपलब्ध झाल्यामुळे या लाभधारकांचे सणवार गोड होणार आहे़ वाराणसी येथील बेटा इडीबल प्रोसेसिंग प्रा़लि़ या कारखान्याच्या वतीने जिल्ह्यासाठी साखर पुरवठा झाला आहे़ (प्रतिनिधी)