महिनाभरात रंगणार साडेचारशे विकास सोसायट्यांच्या निवडणुका

By Admin | Updated: November 28, 2014 01:12 IST2014-11-28T00:11:37+5:302014-11-28T01:12:06+5:30

लातूर : येत्या महिनाभरात जिल्हाभरातील क आणि ड वर्गाच्या ४६९ विविध कार्यकारी विकास सोसायट्यांच्या निवडणुकांची धुळवड रंगणार आहे

Seasonal Development Societies Elections | महिनाभरात रंगणार साडेचारशे विकास सोसायट्यांच्या निवडणुका

महिनाभरात रंगणार साडेचारशे विकास सोसायट्यांच्या निवडणुका

 
लातूर : येत्या महिनाभरात जिल्हाभरातील क आणि ड वर्गाच्या ४६९ विविध कार्यकारी विकास सोसायट्यांच्या निवडणुकांची धुळवड रंगणार आहे. सोसायट्यांच्याच निवडी राहील्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला आणखी मुदतवाढ मिळाली असून शासनाचे तसे आदेशही जिल्हा उपनिबंधकांना आले आहेत.
जिल्हा बँक आणि शेतकरी यांच्यातील गावा-गावातील दुवा असलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांचा निवडणुकीची घोषणा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून झाली आहे. ३१ मार्च २०१३ आणि ३१ आॅक्टोबर २०१३ या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ४६९ विकास सोसायट्यांच्या निवडणुकीची तयारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे. मुदत संपलेल्या सर्व सोसायट्यांना पत्रव्यवहार करुन सर्वसाधारण सभा बोलावून गुप्त मतदान पध्दतीने निवडणुका घेण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता गावा-गावात सोसायट्यांचे मेंबर होण्यासाठी लढती रंगणार आहेत.
सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी आॅडीटनुसार प्रवर्ग घोषित करण्याची परंपराही यंदा मोडीत निघाली असून शासनाने अ, ब, क आणि ड अशा चार सुचीप्रमाणे सहकारी संस्थांची वर्गवारी केली आहे.
आॅडीटनुसार प्रवर्ग करण्याच्या पध्दतीतही बदल केला असून नव्या वर्गवारीनुसार जिल्ह्यातील बहुतांश सोसायट्या क आणि ड वर्गातच जोडल्या आहेत. पहिल्या आठ दिवसात आता जिल्ह्यातील ९६ निवडणुकांच्या तयारीत प्रशासन आहे. त्याच्या प्रसिध्द झाल्या आहेत. येत्या आठ दिवसात निवडणुका उरकून पाठोपाठ इतर अन्य सोसायट्यांच्या निवडणुकांचा बार उडविण्यात येणार आहे.

Web Title: Seasonal Development Societies Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.