पळवून नेले; लग्न केले; मुलगी झाली अन् पुढे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:43 IST2017-09-09T00:43:04+5:302017-09-09T00:43:04+5:30

अल्पवयीन मुलीला पेंटींग काम करणाºया मुलाने पळवून नेले. तिच्यासोबत आळंदीमध्ये लग्नही केले. त्यानंतर त्यांना एक गोंडस चिमुकलीही झाली. परंतु तिच्या आईने अपहरणाचा गुन्हा नोंदविला असल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने या जोडप्याला पुण्यात पकडले.

Search of "Sairat" couple | पळवून नेले; लग्न केले; मुलगी झाली अन् पुढे...!

पळवून नेले; लग्न केले; मुलगी झाली अन् पुढे...!

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अल्पवयीन मुलीला पेंटींग काम करणाºया मुलाने पळवून नेले. तिच्यासोबत आळंदीमध्ये लग्नही केले. त्यानंतर त्यांना एक गोंडस चिमुकलीही झाली. परंतु तिच्या आईने अपहरणाचा गुन्हा नोंदविला असल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने या जोडप्याला पुण्यात पकडले. सैराट जोडप्यासह पथक बीडकडे रवाना झाले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी करण्यात आली.
साधारण साडे तीन वर्षांपूर्वी १७ वर्षिय अल्पवयीन मुलीला गल्लीतीलच पेंटींग काम करणाºया एका २१ वर्षीय मुलाने पळवून नेले होते. त्यानंतर मुलीच्या आईने बीड शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. शहर पोलिसांनी तपास केला परंतु त्यांना ते मिळून आले नाहीत.
मग हा तपास आठ महिन्यांपूर्वी अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडे आला. पोलीस उपनिरीक्षक दीपाली गित्ते यांनी तपासाची चक्रे गतीने फिरविली. संपूर्ण टिम कामाला लागली. मुलगा पेंटींग काम करीत असल्याने त्याच्या क्षेत्रातील बीडसह औरंगाबाद, पुणे आदी ठिकाणी चौकशी केली. हे जोडपे पुण्यात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर टिम पुण्यात दाखल झाली. परिसरात चौकशी करून खात्री पटताच त्यांनी झडप घालत या जोडप्याला पेठ (ता. अंबेगाव जि.पुणे) पकडले. या जोडप्याला घेऊन पथक बीडला रवाना झाले असून बीड शहर पोलिसांच्या स्वाधिन त्यांना केले जाणार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपाली गित्ते, आप्पासाहेब सानप, शिवाजी भारती, शेख शमिम पाशा, सतीश बहिरवाळ, रेखा गोरे, नीलावती खटाणे, सोनाली चौरे, विकास नेवडे आदींनी केली.

Web Title: Search of "Sairat" couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.