सोशल मीडियामुळे लागला मतिमंद युवकाचा शोध
By Admin | Updated: February 8, 2017 00:20 IST2017-02-08T00:19:06+5:302017-02-08T00:20:14+5:30
जेवळी (जि. उस्मानाबाद) : देवदर्शनासाठी जातो म्हणून आठ महिन्यापूर्वी घरातून निघून गेलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील एका मतिमंद युवकाचा व्हाटस््अॅप व फेसबुक या सोशल मीडियामुळे शोध लागला आहे़

सोशल मीडियामुळे लागला मतिमंद युवकाचा शोध
जेवळी (जि. उस्मानाबाद) : देवदर्शनासाठी जातो म्हणून आठ महिन्यापूर्वी घरातून निघून गेलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील एका मतिमंद युवकाचा व्हाटस््अॅप व फेसबुक या सोशल मीडियामुळे शोध लागला आहे़ एका गुरूजींच्या प्रयत्नामुळे आठ महिन्यानंतर तो मुलगा पालकांकडे परतला आहे़
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील संदीप पांडुरंग काडेकरी (वय-३०) हा तरुण भोळसर आणि मतिमंद आहे़ त्याचे नववीपर्यंत शिक्षण झाले आहे़ आठ महिन्यांपूर्वी अक्कलकोटला दर्शनासाठी जातो असे सांगून तो निघून गेला़ त्यानंतर तो परत आलाच नाही पांडूरंग काडेकरी हे एकुलत्या एक मुलाच्या शोधासाठी अक्कलकोट येथे तीन- चार वेळा येऊन गेले़ तसेच तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर इ. ठिकाणी त्याचा शोध घेतला़ मात्र, त्याचा शोध लागला नाही़
चार दिवसापूर्वी संदीपचा फोटो व्हाटस्अॅप आणि फेसबुकवर आला़ तो फोटो त्याला शिक्षण देत असलेले वर्गशिक्षक बोधे यांनी पाहिला़ त्यावेळी संदीप हा उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील धानुरी येथे असल्याची माहिती त्यांनी संदीपच्या घरी दिली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी कागल येथून आलेले त्या मुलाचे वडील पांडुरंग काडेकरी, विलास खोत, जगदीश काटकर यांनी संदीपला ताब्यात घेतले़ त्याची भेट होईल ही आशा घरच्यांनी सोडून दिली होती़ मात्र, शिक्षक शेटे यांच्या प्रयत्नाने संदीप परत भेटल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले़ संदीपची घरच्यांशी भेट घालून देण्यासाठी वडगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर येणेगुरे, पोलीस पाटील धनराज हावळे, बसलिग येणेगुरे यांनी सहकार्य केले़