हॅथवे-एमसीएनला सील ठोकले

By Admin | Updated: October 30, 2014 00:30 IST2014-10-30T00:15:03+5:302014-10-30T00:30:27+5:30

औरंगाबाद : ७२ लाख रुपये करमणूक कर थकविल्याप्रकरणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी हॅथवे- मराठवाडा केबल नेटवर्क (एमसीएन) कार्यालयास सील ठोकले.

Sealed Hathway-MCN Seal | हॅथवे-एमसीएनला सील ठोकले

हॅथवे-एमसीएनला सील ठोकले

औरंगाबाद : ७२ लाख रुपये करमणूक कर थकविल्याप्रकरणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी हॅथवे- मराठवाडा केबल नेटवर्क (एमसीएन) कार्यालयास सील ठोकले. यावेळी हॅथवे- एमसीएनकडून तात्काळ २५ लाख रुपये भरण्यात आले आणि उर्वरित रक्कम भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर महसूल विभागाने सील काढले.
तहसीलदार विजय राऊत यांनी सांगितले की, हॅथवे- एमसीएन केबल नेटवर्ककडे आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांच्या करमणूक कराचे ७२ लाख रुपये थकले होते. ही रक्कम तातडीने भरावी, यासाठी हॅथवे- एमसीएन व्यवस्थापनाला नोटीस दिली होती. नोटिसीमध्ये दिलेली मुदत संपल्यानंतरही त्यांनी रक्कम भरली नाही, त्यामुळे आज २९ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हॅथवे- एमसीएनच्या कार्यालयास सील ठोकले. त्यावेळी व्यवस्थापनाने एकूण करापैकी तासाभरात २५ लाख रुपये जमा केले, तसेच उर्वरित रक्कम भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागवून घेतली. तेव्हा प्रशासनाने त्यांना उर्वरित रक्कम भरण्याकरिता मुदत देत कार्यालयास लावलेले सील उघडले.
या कारवाईत तहसीलदार विजय राऊत, नायब तहसीलदार एस.जी. पोटे, करमणूक कर निरीक्षक प्रल्हाद लोखंडे, पवार, मोरे, खेडेकर, शेवतेकर आणि ढमाले यांच्या पथकाने सहभाग घेतला.

Web Title: Sealed Hathway-MCN Seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.