शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
4
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
5
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
6
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
7
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
8
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
9
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
11
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
12
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
13
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
14
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
15
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
16
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
17
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
18
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
19
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
20
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणांच्या २२९ बॅगा सील

By admin | Updated: July 24, 2014 00:28 IST

हिंगोली : बीजोत्पादन कार्यक्रम न घेता दोन कंपनीच्या नावाने विक्री होत असलेल्या बनावट सोयाबीनचे बियाणे तपासणीअंती उघडकीस आले.

हिंगोली : बीजोत्पादन कार्यक्रम न घेता दोन कंपनीच्या नावाने विक्री होत असलेल्या बनावट सोयाबीनचे बियाणे तपासणीअंती उघडकीस आले. बुधवारी सायंकाळी केलेल्या या कारवाईत २२९ बॅगांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सील ठोकले. शिवाय या बियाण्यांचे नमुने काढून प्रयोगशाळेत तपासणीस पाठविले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी दिली.
बीजोत्पादनाचा कार्यक्रम न करता सागर अ‍ॅग्रो इन फुडस् आणि अनमोल सिड्स या कंपनीच्या नावाने सोयाबीनचे बियाणे विकले जात होते. दोन्ही कंपन्यांच्या नावाची पॅकिंंग करून बनावट बियाणे सर्रास विकले जात होते. त्यासंबंधीच्या तक्ररी आल्यामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात या कंपनीचे बियाणे पकडून त्याची विक्री थांबविण्यात आली होती. बुधवारी त्या धरतीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शहरातील बालाजी कृषी केंद्राची सायंकाळी तपासणी केली.
त्यात सागर अ‍ॅग्रो इन फुडस् आणि अनमोल कंपनीच्या बियाण्यांच्या ४५० बॅगा विक्रीसाठी आणल्याचे अधिकाऱ्यांना समजले. यापूर्वी त्यातील १२१ बॅगा विक्री झाल्या असून सध्या २२९ बॅगा शिल्लक असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. तात्काळ गुणवत्ता निरीक्षक उत्तम वाघमारे आणि कपाळे यांनी शिल्लक बॅगांमधील बियाण्याचे नमूने काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून दिले.
उर्वरित सर्व बॅगांना सील मारल्याची माहिती संजय नाब्दे यांनी दिली. (प्रतिनिधी)