स्कुलबसचा डाटा मिळणार एका क्लिकवर
By Admin | Updated: December 20, 2015 23:51 IST2015-12-20T23:38:38+5:302015-12-20T23:51:29+5:30
आशपाक पठाण , लातूर स्कुल बसने विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या शाळा-महाविद्यालयात परिवहन समित्या गठित करण्याचे निर्देश असतानाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या शाळा

स्कुलबसचा डाटा मिळणार एका क्लिकवर
आशपाक पठाण , लातूर
स्कुल बसने विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या शाळा-महाविद्यालयात परिवहन समित्या गठित करण्याचे निर्देश असतानाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या शाळा व्यवस्थापनाला आता स्कुल बसचे नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहे़ यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने एक वेबसाईट तयार केली असून २६ जानेवारीपर्र्यंत बसचा सर्व डाटा फिडिंग होणार असून एका क्लिकवर पालकांनाही पाहिजे ती माहिती मिळविता येणार आहे़
महाराष्ट्र मोटार वाहन नियम २०११ नुसार स्कुल बसकरिता तयार करण्यात आलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन विभागाने हे पाऊल उचलले आहे़ शाळेने परिवहन समिती गठित केली की नाही, केली तर तिच्या बैठका वेळेत होतात की नाही, समिती नियमाप्रमाणेच गठित करण्यात आली की नाही याबाबतची माहिती शासनास सादर करणे आवश्यक असते़ मात्र, जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी याकडे पाठ फिरविली असून समित्याही गठित करण्यात आल्या नाहीत़ शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांना वारंवार सूचना केल्यावरही समितीबाबत फारसे गांभीर्य नसल्याचे आढळून आले आहे़ त्यामुळे आरटीओकडून तयार करण्यात आलेल्या वेबसाईटवर शाळांना माहिती भरावी लागणार आहे.