दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले
By Admin | Updated: September 4, 2014 00:20 IST2014-09-04T00:08:51+5:302014-09-04T00:20:17+5:30
श्रीक्षेत्र माहूर : गणेशोत्सव सुरू असल्याने श्रीक्षेत्र माहूरगडावर भाविकांची प्रचंड गर्दी होत असून येत्या २८ तारखेपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे.

दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले
श्रीक्षेत्र माहूर : गणेशोत्सव सुरू असल्याने श्रीक्षेत्र माहूरगडावर भाविकांची प्रचंड गर्दी होत असून येत्या २८ तारखेपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. उत्सव काळात माहूरगडावर लाखोंच्या संख्येने भाविक येतात. भाविकांना गडावर पोहोचविण्यासाठी शंभरावर बसेस रात्रं-दिवस ये-जा करतात, परंतु यावर्षी घाटरस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली ठिसूळ असलेल्या पहाडांच्या बुडाला प्रचंड खोदकाम करण्यात आल्याने ठिक-ठिकाणी दरडी कोसळत असून सोबतच पहाडातील झाडेही पडत असून पडलेली झाडे व मलबा कुठे गायब होते हे कळण्यास मार्ग नसून यात्रा काळात पाऊस असल्यास अचानकपणे दरडी कोसळून भाविकांच्या जीविवास धोका होण्याची संभावना नाकारता येत नाही.
श्रीक्षेत्र माहूरगडावर येत्या २८ तारखेपासून नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार असून त्यानिमित्ताने एस.टी., पोलिस, आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून रेणुकादेवी संख्यांवरील प्रशासकीय मंडळानेही भाविकांच्या सुरक्षेसाठी व त्यांना त्रास होवू नये यासाठी पाणी सुरक्षा व इतर सुविधा तपासून घेवून पूर्ण ताकदीनिशी कार्यान्वित केल्या आहे. पूर्ण मंदिर परिसर पायऱ्या व इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येवून संस्थान वरील सर्व कारभाराचे संगणकीकरण करण्यात आलेले आहे.
तीर्थक्षेत्र विकास योजना कार्यान्वित करुन माजी मुख्यमंत्री यांनी दिलेल्या ७९ कोटी रुपयांपैकी २९ कोटी रुपयातून माहूर शहर ते रेणुकादेवी संस्थान ते गरुड गंगेपर्यंत रस्ता बनविण्यात आला आहे. येथून पुढे दत्तश्खिर अनुसया माता मंदिरापर्यंत रस्ता जीवघेना ठरत आहे. बनविण्यात आलेल्या रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम संथगतीने होत असल्याने हा रस्ताही अपघातास कारणीभूत ठरत आहे. नवरात्रोत्सव तोंडावर आल्याने ऐनवेळी धावपळ करण्याऐवजी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी यात्रा काळात भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेवून सर्व देवस्थाने पोलिस आरोग्य वाहतूक सुरक्षा व अपघात प्रवण रस्त्याची पाहणी करुन भाविकांना दर्शन सुलभ होईल, अशी व्यवस्था करावी.
माहूरच्या विकासासाठी बनविण्यात आलेल्या प्राधिकरणास फोर ट्रेस कंपनीने सुचविलेल्या प्रमाणे गडावरील रस्ता बनविण्यात आला असून श्री रेणुकादेवी मंदिराच्या पश्चिम बाजू मंदिर असलेल्या मूळ पहाडाला कोरला रस्ता बनविण्यात आल्या. आधीच भुसभुशीत असलेल्या या पहाडातून दरडी प्रमाणे मंदिराच्या पायथ्याचा भाग पावसामुळे डगरुन जात असल्याने मंदिरापासून फक्त शंभर फुट खालील भाग कोसळत असून तत्काळ उपाययोजना न केल्यास मंदिराला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्यासाठी खोदण्यात आलेल्या पहाडावरील टेकड्यावरील झाडे पावसाने खीळखीळी होवून पडत असून घाटरस्त्यावरील शेकडो झाडे पडून चोरुन नेण्यात आली असून गेल्या आठ दिवसातील पावसाने शेकडो झाडे रस्त्यावर पडली असून तस्करांकडूनही चोरुन नेली जात असून वन कर्मचारी संपावर असल्याने वन तस्करांची मात्र चांदी होत आहे. (वार्ताहर)