विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजलेल्या शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:01+5:302021-02-05T04:08:01+5:30

घाटनांद्रा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा ...

Schools full of students' chirping | विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजलेल्या शाळा

विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजलेल्या शाळा

घाटनांद्रा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा शाळेचा परिसर गजबजला आहे.

कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नाही. योग्य ती खबरदारी घेऊन व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. घाटनांद्रा येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळा, इंद्रगढी व एकता प्राथमिक शाळा, नॅशनल मराठी शाळा, जोगेश्वरी शाळा, मौलाना आझाद उर्दु हायस्कूल या शाळेची घंटा बुधवारी वाजली. सर्व शालेय व्यवस्थापनाने सॅनिटायझर फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण केला. सर्वत्र साफसफाई करण्यात आली होती. शिक्षकांनी थर्मल मशीनद्वारे मुलांची तपासणी केली. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मुख्याध्यापक गुंफा आंदे, भरत सुपेकर, शाहीर गायकवाड, संदीप सपकाळ, शेख इब्राहीम व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी करताना शिक्षक ( छाया : दत्ता जोशी)

Web Title: Schools full of students' chirping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.