शाळकरी विद्यार्थ्याची आत्महत्या
By Admin | Updated: September 11, 2016 01:23 IST2016-09-11T01:17:48+5:302016-09-11T01:23:27+5:30
औरंगाबाद : दहावीत शिकत असलेल्या १६ वर्षीय मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास छावणी परिसरातील शांतीपुरा येथे ही घटना घडली.

शाळकरी विद्यार्थ्याची आत्महत्या
औरंगाबाद : दहावीत शिकत असलेल्या १६ वर्षीय मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास छावणी परिसरातील शांतीपुरा येथे ही घटना घडली.
आकाश भीमा सुतार (रा. शांतीपुरा) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. आकाश छावणीतील एका शाळेत दहावीत शिकत होता. त्याची बहीण याच शाळेत आहे.
तो आणि त्याची बहीण आज शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास शाळेतून घरी आले. त्याचे आई-वडील मोलमजुरीसाठी पुणे येथे राहतात, तर तो आणि त्याची बहीण आजीसोबत राहत होते. बहीण-भाऊ शाळेतून घरी आले तेव्हा आजी कामाला गेलेली होती. त्यानंतर आकाशची बहीण कामानिमित्त बाहेर गेली. यावेळी तो एकटाच घरी होता. आकाशने घरातील पंख्याला दोर बांधून गळफास घेतला.
१२ वाजेच्या सुमारास त्याची बहीण घरी आली तेव्हा तिला ही घटना दिसली. तिने केलेल्या आरडाओरडीनंतर शेजारील लोक जमा झाले.
त्यांनी त्यास फासावरून उतरवून घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी आकाश यास १२.५० च्या सुमारास तपासून मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी छावणी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.