पाझर तलावात बुडून शाळकी मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:04 IST2021-09-03T04:04:45+5:302021-09-03T04:04:45+5:30

पाचोड : पाझर तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ...

Schoolboy drowns in Pazhar Lake | पाझर तलावात बुडून शाळकी मुलाचा मृत्यू

पाझर तलावात बुडून शाळकी मुलाचा मृत्यू

पाचोड : पाझर तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पैठण तालुक्यातील खंडाळा येथे गुरुवारी दुपारी घडली. गणेश जगन्नाथ आगळे असे मृत मुलाचे नाव आहे.

खंडाळा येथे चौथीच्या वर्गात शिकणारा गणेश आगळे हा सकाळी शेळी चारण्यासाठी स्वतःच्या शेतात गेला होता. त्यांच्या शेताजवळील गायरान जमिनीवरील पाझर तलाव पाण्याने तुडुंब भरलेला आहे. गणेशला यावेळी पोहण्याचा मोह झाला अन् त्याने कपडे तलावाच्या काठावर काढून तलावात उडी मारली; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. आसपास वाचविण्यासाठी कोणीही नसल्याने त्याचा मृत्यू झाला. दुपारी वडील जगन्नाथ आगळे हे शेतात गेल्यानंतर त्यांना शेळी एका झाडाला बांधल्याचे दिसून आले. त्यांनी गणेशला परिसरात शोधले; मात्र सापडला नाही. पाझर तलावाच्या काठावर त्याचे कपडे आढळल्यानंतर त्यांनी तत्काळ नागरिकांना मदतीला बोलावले. गणेशला पाझर तलावाबाहेर काढून विहामांडवा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पाचोड ठाण्यात करण्यात आली आहे. तपास सपोनि. गणेश सुरवसे, कर्मचारी माळी करीत आहेत.

Web Title: Schoolboy drowns in Pazhar Lake