पाण्याविना शाळेत विद्यार्थ्यांचे हाल
By Admin | Updated: July 16, 2014 00:49 IST2014-07-16T00:25:27+5:302014-07-16T00:49:35+5:30
सेनगाव : तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.
पाण्याविना शाळेत विद्यार्थ्यांचे हाल
सेनगाव : तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे तब्बल ११०० विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा परिसरात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
येथील जि. प. प्राथमिक शाळेत ५०० हून अधिक विद्यार्थी आहेत. तर जि.प. माध्यमिक शाळेत जवळपास ६०० विद्यार्थी आहेत. असे दोन्ही शाळेत एकुण ११०० विद्यार्थी आहेत. दुर्लक्षीत असणाऱ्या दोन्ही शाळेत सद्य:स्थितीत पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही शाळेसाठी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेली पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली असून परिणामी शाळेत पिण्यासाठी पाणीच नसल्याची स्थिती आहे.
शाळेत पोषण आहार मिळतो; परंतु पाणी मिळत नसल्याची दयनिय परिस्थिती आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना घरुनच दिवसभर पुरेल ऐवढे पाणी घेवून यावे लागत आहे. काही विद्यार्थी पोषण आहार घेतल्यानंतर शाळा परिसरातील हॉटेल, दुकाने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा शोध घेताना दिसत आहेत. तब्बल ११०० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नसताना शाळा प्रशासन व शिक्षण विभागही बेफीकीर आहे. शाळेत पर्यायी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना असे होताना मात्र दिसत नाही. शाळेत कायमस्वरुपी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी जेणे करून विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबेल, अशी अपेक्षा पालक वर्गातून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
भटंकतीची आली वेळ
सेनगाव येथील जि.प. प्राथमिक व माध्यमिक शाळेत एकुण ११०० विद्यार्थी शिकत आहेत.
सध्या दुर्लक्षीत असणाऱ्या दोन्ही शाळेत सद्य:स्थितीत पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायतीने केलेली पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली.
सेनगाव येथे पाणीपुरवुठ्याची पर्यायी व्यवस्थाच न केल्याने जि.प.च्या दोन्ही शाळांमध्ये पिण्यासाठी पाणीच नसल्याची स्थिती आहे.
शाळेत पोषण आहार मिळतो; परंतु पाणी मिळत नसल्याची दयनिय स्थिती आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना घरुनच दिवसभर पुरेल एवढे पाणी आणावे लागत आहे.
या शाळांमधील काही विद्यार्थी पोषण आहार घेतल्यानंतर परिसरातील हॉटेल, दुकाने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा शोध घेताना दिसत आहेत.
शाळेत कायमस्वरुपी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करून विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवण्याची मागणी होत आहे.