बोंबळी, दरेवाडीतही शाळा कुलूपबंद

By Admin | Updated: September 3, 2014 01:10 IST2014-09-03T00:59:27+5:302014-09-03T01:10:36+5:30

जळकोट / वलांडी : जळकोट येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाची बदली करण्यात आल्याने नाराज झालेल्या काही ग्रामस्थांनी सोमवारी शाळेला टाळे ठोकले होते़

School locked in Bongoli, Darewadi | बोंबळी, दरेवाडीतही शाळा कुलूपबंद

बोंबळी, दरेवाडीतही शाळा कुलूपबंद


जळकोट / वलांडी : जळकोट येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाची बदली करण्यात आल्याने नाराज झालेल्या काही ग्रामस्थांनी सोमवारी शाळेला टाळे ठोकले होते़ त्यापाठोपाठ मंगळवारी टाळे ठोकण्यात आल्याने दोन दिवसांपासून ७०० विद्यार्थ्यांचे अध्ययन कुलूपबंद झाले़ दरम्यान, देवणी तालुक्यातील बोंबळी व दरेवाडी येथेही शिक्षकांची जागा भरण्यात येत नसल्याने मंगळवारी शाळेला टाळे ठोकण्यात आले़
जळकोटच्या जिल्हा परिषद शाळेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक नरसिंगे यांची प्रशासनाने बदली केली होती़ त्यामुळे नाराज झालेल्या काही लोकांनी सोमवारी बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी चक्क टाळेच ठोकले़ त्यामुळे शाळा भरु शकली नाही़ दुसऱ्या दिवशीही पुन्हा नागरिकांनी शाळेच्या दोन्ही गेटला कुलूप ठोकून निषेध केला़ त्यामुळे विद्यार्थ्यांना आल्यापावलीच घरी परतावे लागले़ शिवाय, शिक्षकांनाही शाळेत जाता न आल्याने त्यांना पंचायत समितीत जाऊन हजेरी द्यावी लागली़ दोन दिवसांपासून शाळे टाळे ठोकल्याने येीिल ७०० विद्यार्थ्यांचे शिक्षण कुलूपबंद झाले आहे़ दरम्या, जिल्हा परिषदेत उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत संबंधित शिक्षकाची बदली रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला़ त्यामुळे उपोषणाला बसलेल्या जळकोटच्या नागरिकांनी सायंकाळी आपले उपोषण मागे घेऊन शाळेचे टाळे काढले़ दरम्यान, देवणी तालुक्यातील बोंबळी व दरेवाडी येथील शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत़ बोंबळी येथील शाळा द्विशिक्षकी आहे़ परंतु, पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ यावेळी निवृत्ती कारभारी, भीमा किशन, प्रद्युम्न लांडगे, माधव लांडगे, तानाजी कारभारी, बळीराम पाटील हजर होते़
शाळेला कुलूप ठोकल्यानंतर देवणीचे गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांनी याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवून दिला आहे़ वरिष्ठ कार्यालयाकडून येणाऱ्या सूचनेप्रमाणे शिक्षकांची व्यवस्था केली जाणार असल्याचे सोनटक्के यांनी सांगितले़
४यासंदर्भात जि़प़ सदस्य सविता कारभारी म्हणाल्या, ज्या शाळेवर तीनपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत़ त्या शाळांचा प्राधान्याने विचार होणार असल्याचे सीईओंनी सांगितले आहे़ त्यामुळे द्विशिक्षकी शाळांचे भविष्य धोक्यात असल्याचेही त्या म्हणाल्या़ तर शिक्षक समितीचे नेते शिवाजीराव साखरे यांनी बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांना शिक्षण समितीने नाहरकत दिल्यास रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लागेल, असे सांगितले़

Web Title: School locked in Bongoli, Darewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.