शाळकरी मुलाचे अपहरण
By Admin | Updated: November 12, 2014 00:25 IST2014-11-12T00:20:47+5:302014-11-12T00:25:18+5:30
उस्मानाबाद : शौचास गेलेल्या एका १३ वर्षीय विद्यार्थ्याला फुस लावून पळवून नेत अपहरण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

शाळकरी मुलाचे अपहरण
उस्मानाबाद : शौचास गेलेल्या एका १३ वर्षीय विद्यार्थ्याला फुस लावून पळवून नेत अपहरण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना सोमवारी सकाळी तांबरी विभागातील लिंबोणी बाग परिसरात घडली़
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शहरातील तांबरी विभागातील लिंबोणी बाग परिसरात राहणारा रोहित राजाभाऊ वाघमारे (वय-१३) हा सोमवारी सकाळी शौचासाठी बाहेर गेला होता़ मात्र, तो घरी परत आला नाही़ त्याचा शोध घेवूनही तो न सापडल्याने त्याचे मामा संतोष पांडुरंग भोसले यांनी शहर पोलिस ठाण्यात रोहित वाघमारे यास कोणीतरी फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याची फिर्याद दिली़ या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि राजेंद्र बनसोडे हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)