शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागातील खांदेपालटात ‘शाळा’!

By admin | Updated: February 1, 2015 00:38 IST

बीड :घोटाळ्याच्या गंभीर प्रकरणांचा ससेमिरा पाठ सोडायला तयार नसताना शिक्षणाधिकारी (प्रा.) पदाचा प्रभारी ‘चार्ज’ घेतलेल्या सुखदेव सानप यांनी खुर्चीत टेकल्यावर पहिला

बीड :घोटाळ्याच्या गंभीर प्रकरणांचा ससेमिरा पाठ सोडायला तयार नसताना शिक्षणाधिकारी (प्रा.) पदाचा प्रभारी ‘चार्ज’ घेतलेल्या सुखदेव सानप यांनी खुर्चीत टेकल्यावर पहिला निर्णय घेतला तो कामकाजातील फेरबदलाचा! मात्र, वरिष्ठांकडील कामे कनिष्ठांना दिल्याने हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.शिक्षण विभागात ५३ कर्मचारी कार्यरत आहेत. कामकाज सुरळीत होण्यासाठी अनुभव, कामाचे स्वरुप, पात्रता या बाबी पाहिल्या जातात. मात्र, सानप यांनी वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडे कनिष्ठ कर्मचाऱ्यांची कामे सोपवून भलताच पायंडा पाडला आहे. शिवाय काहींकडे फक्त एकच विभाग तर काहींना मात्र चार विभागाची जबाबदारी दिली आहे. कनिष्ठ सहायक बी. व्ही. केकाण यांना मावि-२ चे मूळ काम पाहून प्रावि १, मावि ३ ची जबाबदारी दिली आहे. बी. बी. भड यांना भांडार व बैठक ही मूळ कामे करून जावक विभाग पाहण्यास सांगितले आहे. वरिष्ठ सहायक बी. बी. डोळस यांच्याकडे भविष्य निर्वाह निधी, न्यायालयीन प्रकरणे ही मूळ जबाबदारी तर आहेत. शिवाय शालेय पोषण आहार विभागही दिला आहे.शिक्षणाधिकारी सुखदेव सानप म्हणाले, शिक्षण विभागाचा कार्यभार सुरळीत करण्यासाठी सभापतींच्या आदेशानेच फेरबदल केले आहेत. कोणावर अन्याय करण्याचा हेतू नाही. कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतले आहे.देव-घेव ‘पॅटर्न’२१ जानेवारी रोजी निरंतरचे शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांच्याकडे शिक्षणाधिकारी (प्रा.) पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला. यापूर्वी ते पूर्णवेळ शिक्षणाधिकारी होते. खुद्द संचालकांनीही सानप अकार्यक्षम असल्याचा अहवाल दिला होता. आता सानप यांनी शिक्षण विभागात फेरबदल करुन ‘देव-घेव’ पॅटर्नची वाट मोकळी केल्याची चर्चा आहे.कार्यालयीन कामासाठीगेलेल्यांना नोटीससीईओ नामदेव ननावरे यांनी २३ ते २७ जानेवारी दरम्यान कनिष्ठ सहायक गणेश सारुक यांना कार्यालयीन कामासाठी पुणे येथे पाठवले होते. इकडे मात्र सानप यांनी सारुक यांना अनाधिकृत गैरहजर असल्याचा ठपका ठेवत वेतन कपातीची नोटीस पाठविली. कनिष्ठ सहायक एफ. ए. पठाण यांनाही साप्ताहिक गोषवाऱ्याच्या किरकोळ कारणावरुन नोटीस पाठविली. अनेक कर्मचारी दिवसभर खुर्चीत नसतात, कामांत कुचराई करतात असे असताना विशिष्ट कर्मचाऱ्यांना सानप यांनी लक्ष्य केल्याचा आरोप होत आहे. (प्रतिनिधी)४आंतरजिल्हा बदली, प्राथमिक विभाग १, २ ही पदे ‘क्रीमपोस्ट’ची समजली जातात. या पदांचा ‘चार्ज’ मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांत चढाओढ आहे. सानप यांनी शिक्षणाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारताच या पदांचा ‘भाव’ वाढला. त्यामुळे काहींनी ही पदे पदरात पाडून घेण्यासाठी ‘फिल्डींग’ लावली होती.