माजी विद्यार्थ्यांनी केले शाळेचे डिजिटलायजेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 17:32 IST2017-08-20T17:31:54+5:302017-08-20T17:32:51+5:30
आपलेहि शाळेस काही देणे लागते या उदात्त भावनेने त्यांनी एकत्र येत ४ लाखाचा निधी जमा केला. यातून शाळेसाठी १५ टॅब, प्रोजेक्टर, काँम्प्यूटर व होम थिएटर घेऊन शाळेला डिजिटल केले.

माजी विद्यार्थ्यांनी केले शाळेचे डिजिटलायजेशन
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. २० : सिल्लोड तालुक्यातील भवन येथील जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी असून उच्च पदावर आहेत. समाजातील प्रतिष्ठेचे स्थान हे केवळ शाळेमुळे मिळाले आहे, आपलेहि शाळेस काही देणे लागते या उदात्त भावनेने त्यांनी एकत्र येत ४ लाखाचा निधी जमा केला. यातून शाळेसाठी १५ टॅब, प्रोजेक्टर, काँम्प्यूटर व होम थिएटर घेऊन शाळेला डिजिटल केले.
'शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने माणूस बहुश्रुत व विवेकी बनतो' कर्मविरांच्या या वाक्यांची प्रचिती भवन येथील जि. प. शाळेत अत्याधूनिक व सुसज्य डिजीटल क्लास रुम च्या लोकार्पण सोहळ्यात आली. याच शाळेत १९८६-८७ सालच्या पहील्या वर्गातील विद्यार्थांच्या तुकडीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून २७ वर्षानंतर एकत्र येवून शाळा डिजीटल करण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबवला. यामुळे आज शाळेत शिकणा-या सर्व सामान्य गरीब कुटूंबातील मुलांना शिक्षणासाठी अत्याधुनिक सेवा उपलब्ध झाल्या आहेत.
या अत्याधूनिक व सुसज्य डिजीटल क्लास रुमचा लोकार्पण सोहळा आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी माजी आमदार कल्याण काळे, नगराध्यक्ष अब्दुल समीर, जि.प.उपाध्यक्ष केशवराव तायडे, शांतीलाल अग्रवाल, मुख्याध्यापक एच. बी.उरफाटे, सरपंच सुरेखा कळम, नंदकिशोर सहारे, काकाराव कळम, सुनिल लांडगे, विजय खाजेकर, दिपक सोनवणे, रूपेश ठाकूर व केंद्रातील शिक्षक, ग्रामस्थ तसेच आजी-माजी विद्यार्थी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रमोद सुरडकर यांनी तर आभार देविदास बोर्डे यांनी मानले.
यांनी राबविला उपक्रम...
भवन जिल्हा परिषद शाळेचे अजय खाजेकर, सुनील सातघरे, दशरथ तेलंग्रे, एकबाल शेख, शिवाजी तुपे, विलास सिरसाट, संतोष कावले, अंकुश देवरे, अंकुश बडक, किरण गोराडे, राजू काकडे, गजानन काकडे, देविदास बोर्डे, स्वप्ना माद्निकर, अनिता गावंडे, रोहिणी जोशी, कल्पना साखरे, अर्चना कळम, कल्पना गोंगे, संगीता तुपे, विमल कुंटे, सविता शिंदे, गीता तांबट, मंगल ठुबे या माजी विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमात सहभाग घेतला.
माझी शाळा
प्रत्येक गावातील शाळेच्या माजी विद्यार्थांनी एकत्र येवून शाळेचा व गावाचा विकास साधावा.जेणेकरुन आजी विद्यार्थी यातून प्रेरणा घेतील. यासोबतच यापुढे हि आम्ही 'माझी शाळा' या उपक्रमाच्या माध्यमातून मदतीस तत्पर आहोत. इंग्रजी शाळे सारख्या सुविधा आमच्या शाळेत मिळाव्या या हेतुने आम्ही ही शाळा डिजीटल केली. - अजय खाजेकर, माजी विद्यार्थी, भवन जिल्हा परिषद शाळा.