शाळेची बस जाळली
By Admin | Updated: June 11, 2017 23:49 IST2017-06-11T23:46:57+5:302017-06-11T23:49:59+5:30
गंगाखेड : येथील रतननगर परिसरातील बालविकास प्राथमिक शाळेची बस जाळून नुकसान केल्या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये एकाविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़

शाळेची बस जाळली
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : येथील रतननगर परिसरातील बालविकास प्राथमिक शाळेची बस जाळून नुकसान केल्या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये एकाविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़
रतननगर परिसरातील बाल विकास प्राथमिक शाळेची एमएच २२ व्ही १७५६ ही बस शाळेच्या आवारात उभी होती़ ७ जूनच्या रात्री ८़३० च्या सुमारास बस जळताना दिसून आली़ नागरिकांच्या मदतीने बस विझविण्याचा प्रयत्न केला़ मात्र तोपर्यंत ती जळून खाक झाली होती़ याप्रकरणी संस्थाध्यक्ष भागवत डावरे यांच्या फिर्यादीवरून शाळेचा सेवक माधव तिगोटे याच्याविरूद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे़ पोलीस निरीक्षक सोपानराव सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दीपक भारती, राहुल मोरे तपास करीत आहेत़