शाळा प्रवेश दिन जल्लोषात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:43 IST2017-11-08T00:43:22+5:302017-11-08T00:43:26+5:30

महापालिकेच्या शाळांचे आधुनिकीकरण करुन गुणवत्ता वाढवण्यासाठी आगामी कालावधीत प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आ. डी.पी. सावंत यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील प्रवेशाचा पहिला दिवस हा राज्यभरात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जात आहे. मनपाच्या प्रभातनगर येथील शाळेत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर शीलाताई भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

School admirers celebrate celebration day | शाळा प्रवेश दिन जल्लोषात साजरा

शाळा प्रवेश दिन जल्लोषात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेच्या शाळांचे आधुनिकीकरण करुन गुणवत्ता वाढवण्यासाठी आगामी कालावधीत प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आ. डी.पी. सावंत यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील प्रवेशाचा पहिला दिवस हा राज्यभरात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जात आहे. मनपाच्या प्रभातनगर येथील शाळेत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर शीलाताई भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातारा येथील राजवाडा चौकात असलेल्या प्रतापसिंग हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० या दिवशीे शाळा प्रवेश झाला होता. या शाळेच्या रजिस्टरला १९१४ या क्रमांकासमोर आजही बाल भीवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तावेज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिवस ही अत्यंत महत्त्वाची आणि इतिहासाला कूस बदलावयास लावणारी क्रांतिकारी घटना आहे. त्यांचा शाळा प्रवेश दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
जंगमवाडी येथील मनपा शाळेत विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास महापौर शीलाताई भवरे, माजी राज्यमंत्री आ. सावंत, उपमहापौर विनय गिरडे, माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे, नगरसेवक अ‍ॅड. महेश कनकदंडे, राजू यन्नम, शिक्षणाधिकारी बी. आर. बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. महापालिका शिक्षण विभागाने मनपा शाळामधील अडीअडचणी महापौर तसेच आ. सावंत यांच्यापुढे ठेवल्या. त्या सोडविण्यासाठी निश्चितपणे सकारात्मक दृष्टीने पावले उचलली जातील, असे आ.सावंत यांनी स्पष्ट केले.

Web Title: School admirers celebrate celebration day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.