दोन महिन्यांपासून रेबीज लसचा तुटवडा
By Admin | Updated: July 27, 2016 00:48 IST2016-07-27T00:18:53+5:302016-07-27T00:48:13+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून अॅन्टी रेबीज व्हॅक्सिनचा (ए.आर.व्ही) तुटवडा आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची चिंता वाढत

दोन महिन्यांपासून रेबीज लसचा तुटवडा
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून अॅन्टी रेबीज व्हॅक्सिनचा (ए.आर.व्ही) तुटवडा आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची चिंता वाढत असून जास्तीचे पैसे मोजून मेडिकल स्टोअर्समधून लस घेण्याची वेळ येत आहे.
कुत्रा चावल्यानंतर रुग्णांना अॅन्टी रेबीज व्हॅक्सिन (ए.आर.व्ही) दिले जाते, तर पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे होणाऱ्या जखमेत रेबीजचे विषाणू असतात. रेबीजच्या विषाणूंना तातडीने नियंत्रणात न आणल्यास ते मेंदूपर्यंत जातात आणि रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे अशा रुग्णांना तातडीने अॅन्टी रेबीज सिरम (ए.आर.एस) देण्यात येते. औरंगाबाद शहरातील विविध भागांमध्ये सध्या मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयात दररोज दहा ते पंधरा रुग्ण उपचारासाठी येतात. कुत्रा चावल्यावर पहिल्यांदा अॅन्टी रेबीज व्हॅक्सिन देणे आवश्यक ठरते. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून या लसचा तुटवडा आहे. त्यामुळे अधिक पैसे मोजून मेडिकल स्टोअर्समधून लस घेण्याची गोरगरीब रुग्णांवर वेळ येत आहे.