शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरसाठी १ कोटी ८७ लाखांचा टंचाई आराखडा तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 18:09 IST

सलग चार वर्षांपासून टंचाईच्या सर्वाधिक झळा सहन करणाऱ्या वैजापुर तालुक्यातील गावांना यंदा परतीच्या पावसामुळे चांगला दिलासा मिळाला. तरीही गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता तालुका प्रशासनाने जानेवारी २०१८ ते मार्च २०१८ या कालावधीसाठी १ कोटी ८७ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे.

ठळक मुद्देवैजापुर तालुक्यात १५५ टँकरद्वारे गतवर्षी पाणीपुरवठा करण्यात आला होता. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता तालुका प्रशासनाने जानेवारी २०१८ ते मार्च २०१८ या कालावधीसाठी १ कोटी ८७ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे.

- मोबीन खान 

वैजापुर (औरंगाबाद ) : सलग चार वर्षांपासून टंचाईच्या सर्वाधिक झळा सहन करणाऱ्या वैजापुर तालुक्यातील गावांना यंदा परतीच्या पावसामुळे चांगला दिलासा मिळाला. तरीही गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता तालुका प्रशासनाने जानेवारी २०१८ ते मार्च २०१८ या कालावधीसाठी १ कोटी ८७ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे.

वैजापुर तालुक्यात १५५ टँकरद्वारे गतवर्षी पाणीपुरवठा करण्यात आला होता. परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे अनेक गावातील विंधन विहिरी, विहिरीला पाणी आहे़ याशिवाय गोदावरी नदीकाठच्या गावांनाही नदीपात्रात पाणी असल्यामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे़ अद्याप तालुक्यातून पाणीटंचाईसाठी बाबतारा या एकाच ग्रामपंचायतीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे आलेला आहे. तरीही खबरदारी म्हणून प्रशासनाने कृती आराखडा तयार करून मंजूरीसाठी पाठवला असल्याचे गटविकास अधिकारी पुष्पा पंजाबी यांनी सांगितले़. तालुक्यात दरवर्षीच 'लेट लतीफ' अधिकारी मंडळी पाणीटंचाई आराखडा तयार करण्याची लगबग जानेवारी अखेर दाखवायचे. त्यामुळे हा आराखडा मंजूर होण्यास फेब्रुवारीच उजाडायचा. यंदा हा कृती आराखडा गटविकास अधिकारी पुष्पा पंजाबी यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तयार करुन  मंजूरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठवल्याने त्याची अंमलबजावणीही त्याच गतीने होणे अपेक्षित आहे.

शेवटच्या टप्प्यात झालेल्या पर्जन्यामुळे टंचाईचा काळ लांबला असला तरी यंदा अल्पपर्जन्यामुळे टंचाईच्या झळा लवकर बसण्याची भीती आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत १८७.०४ कोटींच्या १९३ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यात २३ गावांतील नळयोजनेच्या दुरुस्तीचा ६९.०० लाखांचा प्रस्ताव आहे. ५८ गावांत ७१.०० लाखांच्या १४२ नवीन विंधन विहिरींचा प्रस्तावही आराखड्यात आहे. ८ गावांसाठी १४ विहीर-बोअर अधिग्रहणासाठी ५.०४ लाखांचे प्रस्तावित केले आहेत.तर ८ गावांसाठी १४ टँकरला ४२.०० लाख  प्रस्तावित केले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीwater transportजलवाहतूक