एआरटी केंद्रात औषधांचा तुटवडा; रुग्णांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 00:18 IST2016-08-28T00:10:27+5:302016-08-28T00:18:29+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यातील एच़आय़व्ही. बाधित रुग्णांना शासकीय रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयातील एआरटी केंद्रातून औषध-गोळ्यांचा पुरवठा केला जातो़

एआरटी केंद्रात औषधांचा तुटवडा; रुग्णांची गैरसोय
लातूर : लातूर जिल्ह्यातील एच़आय़व्ही. बाधित रुग्णांना शासकीय रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयातील एआरटी केंद्रातून औषध-गोळ्यांचा पुरवठा केला जातो़ या विभागातील ‘एलपीव्हीआर’ गोळ्यांचा स्टॉक मागील दोन दिवसांपासून संपल्याने औषध-गोळ्यांचा तुटवडा निर्माण झालेला आहे़ शासनाकडूनच अनियमित औषध-गोळ्यांचा पुरवठा होत नसल्याने रुग्णांची ससेहोलपट होत आहे़
लातूर जिल्ह्यातील नागरिकांत एड्सबाबत जागरूकता यावी़ एड्सच्या रुग्णांचे समुपदेशन व औषध-उपचार करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेंतर्गत आयसीटीसी आणि एआरटी केंद्र सुरू केले आहेत़ या केंद्रामार्फत येणारी औषधी आॅनलाईन मागविली जात आहे़ परंतु, पुरेसा औषध पुरवठा होत नसल्याने रुग्णांची कायम गैरसोय होत आहे़