शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतल्या तक्रारीसाठी क्यूआर कोड स्कॅन करा; गुन्ह्यात आता २ तासांत होणार एफआयआर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 16:22 IST

‘मिशन ट्रस्टेड पोलिसिंग’; रेल्वे स्थानक, लोहमार्ग पोलिस ठाण्यांवर क्यूआर कोड लावण्यात आले आहेत

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेमध्ये घडलेल्या कुठल्याही गुन्ह्यात तक्रारदार लोहमार्ग पोलिस ठाण्यात आल्यानंतर आता दोन तासांमध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. बेपत्ता प्रकरणात तासाभरात कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यात लोहमार्ग पोलिसांच्या प्रतिसादाबाबत तक्रारदार, प्रवासी समाधानी आहेत की नाहीत, याची आता थेट लोहमार्ग पोलिस महासंचालक दखल घेणार आहेत. त्यासाठी रेल्वे स्थानक, लोहमार्ग पोलिस ठाण्यांवर क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर अंतर्गत येणारी १० पोलिस ठाणी व २१ आऊटपोस्टच्या ठिकाणी बुधवारपासून या उपक्रमाची अंमलबजावणी झाली.

लोहमार्ग पोलिस महासंचालक डाॅ. प्रज्ञा सरवदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून लोहमार्ग घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल सुरू केले. रेल्वेत गुन्ह्यांना बळी पडणाऱ्या प्रवाशांच्या मनात लोहमार्ग पोलिसांविषयी विश्वास निर्माण होण्यासाठी त्यांनी ‘मिशन ट्रस्टेड पोलिसिंग’ हा उपक्रम हाती घेतला आहे. १० जानेवारी रोजी अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर विभागात याची सुरूवात केली. बुधवारी त्यांनी त्याचा डेमो घेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी उपअधीक्षक मनोज पगारे, निरीक्षक गणेश दळवी, सहायक निरीक्षक अमोल देशमुख, प्रशांत गंभीरराव व प्रेमलता जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

काय आहेत सूचना ?- गुन्हा घडल्यापासून २ तासांत गुन्हा दाखल करा.- महिला प्रवाशांची छेड, बालके बेपत्ता प्रकरणात एका तासात कारवाई हवी.- संशयास्पद व्यक्तींच्या तावडीतून बालकांची सुटका करा.- बेवारस, संशयास्पद वस्तूंचा शोध घेऊन तत्काळ कार्यवाही करावी.

क्यूआर कोड कसा काम करणार?- छत्रपती संभाजीनगर अंतर्गत येणारी १० पोलिस ठाणी, २१ आऊटपोस्टच्या ठिकाणी हे क्यूआर कोड लावण्यात आले आहेत.- प्रक्रियेनंतर प्रवासी, तक्रारदार त्याला स्कॅन करून तेथील फिडबॅक फाॅर्ममध्ये अभिप्राय नोंदवतील. त्यात मिळालेल्या अनुभवाविषयी तक्रारदेखील करता येईल.- याची नोंद घेत थेट पोलिस महासंचालक कार्यालयातून पाठपुरावा होईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद