शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत ‘ऐनवेळी’चा घोटाळा, नियमबाह्यपणे २२० ठराव मंजूर; खा. जलील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 15:19 IST

औरंगाबाद महापालिकेतही शिवसेना-भाजपच्या महापौरांनी मिळून तीन वर्षांत २२० ठराव सर्वसाधारण सभा, स्थायी समितीमध्ये ‘ऐनवेळी’ मंजूर केले.

औरंगाबाद : महापालिकेत २०१७ ते एप्रिल २०२० या कालावधीत सर्वसाधारण सभा, स्थायी समितीत ऐनवेळी तब्बल २२० ठराव मंजूर करण्यात आले. नियम धाब्यावर बसवून, आर्थिक अनियमितता करण्यात आली. यासंदर्भात आपण नगरविकास विभागाकडे तक्रार केली आहे. नगरविकास विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी खा. इम्तियाज जलील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

अकोला महापालिकेत २०१८ ते २०२० या कालावधीत ३९ ठराव मंजूर केले होते. शासनाने याप्रकरणी संबंधित महापौर, नगरसचिव यांच्यावर गुन्हे नोंदविण्याचे आदेश आयुक्तांना दिले. औरंगाबाद महापालिकेतही शिवसेना-भाजपच्या महापौरांनी मिळून तीन वर्षांत २२० ठराव सर्वसाधारण सभा, स्थायी समितीमध्ये ‘ऐनवेळी’ मंजूर केले. त्यावर कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. हे ठराव बंद दाराआड मंजूर झाले. यासंदर्भात मी सविस्तर माहिती घेतल्यानंतर विभागीय आयुक्त, नगरविकास विभागाकडे तक्रार केली. त्यावर ८ महिने कोणताही निर्णय घेतला नाही. पुन्हा शासनाला आठवण करून दिली असता प्रशासकांना चौकशीचे आदेश दिले.

नियमानुसार सर्वसाधारण सभा, स्थायी समितीत ऐनवेळीचा विषय किमान १ दिवस अगोदर येणे आवश्यक आहे. तत्कालीन महापाैर नगरसेवकांनी दिलेले प्रस्ताव एक महिना दाबून ठेवले. परत दुसऱ्या महिन्याच्या सभेतील विषयपत्रिकेत ठराव न घेता ऐनवेळी मंजूर करतात. माझ्या दृष्टीने ही मोठी आर्थिक अनियमितता आहे. अनेकदा तर सभा झाल्याच्या एक महिन्यानंतर ऐनवेळी म्हणून विषय मंजूर केले. ऐनवेळीच्या प्रस्तावांवर सभेत चर्चा नको म्हणून हे षडयंत्र रचण्यात आले. १०० कोटींच्या या घोटाळ्याची प्रशासनाने निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अन्यथा आपण न्यायालयात दाद मागणार आहोत, असेही इम्तियाज जलील यांनी नमूद केले.

अनेक प्रस्तावांवर बोट: - २५ कोटींच्या रस्ते कामाचा ठराव ऐनवेळी कशा पद्धतीने मंजूर केला जाऊ शकते?- सव्वा कोटी रुपयांचे वाढीव काम, ऐनवेळी मंजूर करण्याची कोणती आणीबाणी होती?- प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी नेमण्यासाठी प्रस्ताव ऐनवेळी आणायची गरज काय?- एखादे गोदाम, दुकान ऐनवेळीच्या प्रस्तावात मंजूर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा हेतू काय?

कोण होते प्रशासकओम प्रकाश बकोरिया-२६/२/२०१६ ते २४/०४/२०१७डी. एम. मुगळीकर- २४/०४/२०१७ ते १६/०३/२०१८निपुण विनायक- १५/०५/२०१८ ते २४/१०/२०१९आस्तिककुमार पाण्डेय- ०९/१२/२०१९ ते ३१/ ०७/२०२२

काय म्हणतात तत्कालीन महापौरइम्तियाज जलील यांनी कोणामार्फतही चौकशी करावी. अनधिकृत, आर्थिक अनियमितता आढळून आल्यास कायद्यात जी शिक्षा असेल ती आपण भाेगायला तयार आहे. प्रशासनाकडून आलेले, नगरसेवकांकडून आलेले ठराव मंजूर केले. सामाजिक हित लक्षात ठेवून सभागृह निर्णय घेत असतो. एकट्या महापौरांचा हा निर्णय नसतो. सभागृहाचा निर्णय असतो.- बापू घडमोडे, माजी महापौर, भाजप.

कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. पीठासन अधिकारी एकटा निर्णय घेत नाही. त्याने घेतलेला निर्णय संपूर्ण सभागृहाचा असतो. सभागृहात एमआयएम पक्षाचेही नगरसेवक होते. तेव्हाच का विरोध केला नाही. पाच वर्षांनंतर जाग आली. ही निव्वळ राजकीय स्टंटबाजी आहे. त्यांच्या आरोपात तथ्य आढळून आले नाही, तर आपण मानहानीचा दावाही दाखल करू.- नंदकुमार घोडेले, माजी महापौर, शिवसेना.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाImtiaz Jalilइम्तियाज जलील