शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आदर्श, यशस्विनी पतसंस्थेपाठोपाठ राधाई बँकेत घोटाळा; दीड वर्षांनंतर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 20:00 IST

आदर्श, यशस्विनी पतसंस्थेपाठोपाठ आधाने कुटुंब पुन्हा एकदा अडचणीत

छत्रपती संभाजीनगर : आदर्श पतसंस्था व यशस्विनी पतसंस्थेपाठोपाठ देविदास आधानेच्या मुलाच्या नावे असलेल्या राधाई अर्बन मल्टिपर्पज निधी लि. बँकेतील घोटाळ्याप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल झाला आहे. अन्य पतसंस्थेप्रमाणेच या बँकेद्वारे देखील १३ महिन्यांच्या एफडीवर १२ टक्के व्याजाचे आमिष दाखवून देवीदासचा मुलगा पवन आधाने व व्यवस्थापक गणेश शिंदे यांनी ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.

अविनाश नारायण चौधरी (३६, रा. न्यू हनुमाननगर) यांनी याप्रकरणी तक्रार दिली. पवनची आई सविता आधाने हिच्या यशस्विनी महिला स्वयंसहाय्यता गटामार्फत त्यांना राधाई अर्बन बँकेत गुंतवणुकीवर १२ टक्के परताव्याचे आमिष दाखवले गेले होते. त्याचवेळी घराच्या विक्रीतून चौधरी यांना पैसे मिळाले होते. २४ ऑगस्ट २०२१ रोजी चौधरी यांनी आई अंजली चौधरी यांच्या नावाने दोन लाखांच्या दोन एफडी केल्या. स्वत:सह आई, भाऊ, पत्नी, बहीण, मावशी, मावस बहिणीच्या नावे लाखोंच्या एफडी केल्या. मात्र, मुदतीनंतरही त्यांना त्यांना पैसे देण्यास बँकेने नकार दिला. त्याचदरम्यान यशस्विनी पतसंस्थेवर गुन्हा दाखल होऊन राधाई बँकदेखील बंद झाली.

चौधरी यांच्या प्राथमिक तक्रारीवरून २० लाख ४७ हजारांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यात अनेक ठेवीदारांचे पैसे अडकले आहे. त्यामुळे तक्रारदारांसह फसवणुकीची रक्कमही वाढेल, असे तपास अधिकारी प्रमोद देवकाते यांनी सांगितले.

असा आहे घटनाक्रम-१२ जुलै, २०२३ रोजी अंबादाससह देवीदासवर २०२ कोटींच्या अपहरणाचा पहिला गुन्हा.-७ ऑक्टोबर, २०२३ रोजी आदर्श घोटाळ्यात अटक असतानाच देवीदासच्या यशस्विनी महिला गट सहकारी पतसंस्थेतही ४७ कोटी ८२ लाखांचा घोटाळा उघड.-११ ऑक्टोबर, २०२३ राेजी देवीदास, त्याची पत्नी सविताला अटक.-२ नोव्हेंबर, २०२३ रोजी यशस्विनीच्या घोटाळ्यात दुसऱ्यांदा अटक.-११ नोव्हेंबर २०२४ रोजी मुलगा पवन व सुनेला अटक.

आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांचे पथकाने यशस्विनी घोटाळ्याचा तपास केला. नोव्हेंबर, २०२४ अखेरीसपर्यंत एकट्या आधाने कुटुंबाची २३ कोटींच्या संपत्तीची माहिती प्राप्त झाली होती. त्यापैकी १० कोटींची संपत्ती आदर्शच्या संपत्तीत जोडण्यात आली आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी