एसबीआयचे दोन कोटी हडपले
By Admin | Updated: March 19, 2016 01:09 IST2016-03-19T01:07:03+5:302016-03-19T01:09:48+5:30
औरंगाबाद : बँकेला सर्व प्रकारच्या कमिशनपोटी मिळणारी रक्कम ज्या खात्यात असते

एसबीआयचे दोन कोटी हडपले
औरंगाबाद : बँकेला सर्व प्रकारच्या कमिशनपोटी मिळणारी रक्कम ज्या खात्यात असते त्या ‘पार्किंग’ खात्यावरच उपव्यवस्थापक महिलेने डल्ला मारला. या महिला अधिकाऱ्याने गेल्या साडेतीन वर्षांत तब्बल १ कोटी ९८ लाख २२ हजार ९२९ रुपयांची अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अमरप्रीत हॉटेलजवळील शाखेत घडला. सहायक महाप्रबंधकांच्या फिर्यादीवरून गुरुवारी (दि.१७) या प्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
स्नेहल पवार (३५, रा. निशांत रेसिडेन्सी, नंदनवन कॉलनी) असे गुन्हा दाखल झालेल्या उपव्यवस्थापक महिलेचे नाव आहे. या प्रकरणात बँकेने तिला निलंबित केले आहे. मागील १७ वर्षांपासून ती बँकेत काम करीत असून, क्लार्क पदापासून ती उपव्यवस्थापकपदापर्यंत पोहोचली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, अमरप्रीत हॉटेलजवळ एसबीआयची शाखा आहे. येथे ७ सप्टेंबर २०१५ मध्ये सहायक महाव्यवस्थापक म्हणून नंदकिशोर रामविलास मालू (५८, रा. वेदांतनगर) रुजू झाले. रुजू झाल्यावर त्यांनी बँकेतील सर्व खात्यांतील रकमेची तपासणी केली. यात त्यांना पार्किंग खात्यात गडबड झाल्याचे दिसून आले. त्यांनी या प्रकाराची चौकशी केली. त्यात उपव्यवस्थापक स्नेहल पवार हिने हा गैरव्यवहार केल्याचे चौकशीअंती समोर आले. शेवटी मालू यांनी या गैरव्यवहाराबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.
हे प्रकरण आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविले. पोलीस चौकशीत असे आढळून आले की, बँकेच्या (पान २ वर)
आरोपी स्नेहल पवार हिने बँकेच्या पार्किंग खात्यात अफरातफर करून रक्कम वळती केल्याचे उघडकीस आल्यानंतर तिचे पती विनोद पवार यांनी बँकेत १४ जानेवारी २०१६ रोजी ११ लाख ४४ हजार रुपये जमा केले.
मात्र, उर्वरित रक्कम जमा होत नसल्याचे पाहून सहायक महाप्रबंधक नंदकिशोर मालू यांनी क्रांतीचौक ठाणे गाठून तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक हेमंत कदम हे करीत आहेत.