शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

कार हळू चालव म्हणल्याने वाद घातला; बेदम मारहाण करून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 17:59 IST

अजिंठ्यातील या घटनेत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

ठळक मुद्दे या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे 

सिल्लोड ( औरंगाबाद ) : घराशेजारून भरधाव वेगाने कार नेणाऱ्या चालकास गाडी हळू चालव म्हणणे जीवावर बेतले आहे. कार चालकाने रागाच्या भरात लाकडी दांड्याने त्या व्यक्तीला जबर मारहाण केली. उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री अजिंठा येथे घडली. मोहंमद शफीयोद्दीन अब्दुल रहेमान ( ५०, रा.अजिंठा ) असे मृताचे नाव असून या प्रकरणात अजिंठा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

अजिंठा येथील जामा मशीदजवळ असलेल्या बोळीत मोहंमद शफीयोद्दीन अब्दुल रहेमान उभे होते. रात्री १० वाजेच्या सुमारास एक कार भरधाव वेगाने त्याच्या अगदी जवळून गेली. यामुळे घाबरलेल्या मोहंमद शफीयोद्दीन यांनी  चालक सादिकला कार हळू चालव, मारतो का ? असे ओरडून सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी नागरिकांनी मध्यस्थी करून वाद सोडवला. 

दरम्यान, कार चालकाने घरी मोहंमद शफीयोद्दीन यांच्यासोबत वादाची माहिती दिली. यामुळे कार चालकाचे भाऊ व नातेवाईक शेख जावेदजान, मोहमद शेख, अथर शेख हे पुन्हा घटनास्थळी आले. त्यांनी संगनमत करून मोहंमद शफीयोद्दीन यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. कार चालक सादिकने हातातील लाकडी दांडा शफीयोद्दीन यांच्या डोक्यात मारला. रक्त बंबाळ अवस्थेतील शफीयोद्दीन यांना नागरिकांनी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी औरंगाबादकडे रवाना केले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

मृताचा मुलगा शेखमोहम्मद शोफियांन मोहम्मद शफीयोद्दीन ( २३ ) याच्या तक्रारीवरून अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादिक उर्फ मुन्नाजान मोहमद ( २८ ) , शेखजावेदजान मोहमदशेख ( ३२ ) , शेख अथर जाफर बेग ( ३८, सर्व रा.अजिंठा ) अशी आरोपींची नवे आहेत. आरोपींविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात कलम ३०२,३२३,५०४,३४ भादवि  नुसार खुनाचा  गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, फौजदार राजू राठोड, अक्रम पठाण, राजू बरडे,रविकिरण भारती,हेमराज मिरी,अरुण गाडेकर यांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.घटनेची माहिती मिळताच  सिल्लोड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विजयकुमार मराठे यांनी  घटनास्थळी भेट दिली.या घटनेमुळे अजिंठ्यात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी