बीडमध्ये रिपाइं ‘सायलेंट’ !

By Admin | Updated: October 8, 2014 00:52 IST2014-10-08T00:19:24+5:302014-10-08T00:52:59+5:30

बीड : युती, आघाडीच्या फाटाफुटीनंतर रिपाइंने भाजपाच्याच बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला़ मात्र बीडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रिपाइंचे कार्यकर्ते

'Sayant' in Beed! | बीडमध्ये रिपाइं ‘सायलेंट’ !

बीडमध्ये रिपाइं ‘सायलेंट’ !


बीड : युती, आघाडीच्या फाटाफुटीनंतर रिपाइंने भाजपाच्याच बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला़ मात्र बीडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रिपाइंचे कार्यकर्ते कुठेच दिसत नाहीत़ भाजपचे उमेदवार विनायक मेटे यांच्या प्रचारापासून रिपाइंचे नेते, कार्यकर्ते चार हात दूरच आहेत़
रिपाइं नेते रामदास आठवले यांचे विश्वासू सहकारी व युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती़ मात्र तेथे भाजपने प्रा़ संगीता ठोंबरे यांना संधी दिली़ त्यामुळे कागदे समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे़ आठवले यांच्यासोबत सावलीप्रमाणे वावरणारे कागदे हे दलित चळवळीतील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत़ रिपाइंच्या माध्यमातून त्यांनी जिल्हाभर कार्यकर्त्यांचे जाळे उभे केलेले आहे़ मात्र भाजपासोबत युती करूनही रिपाइंचे कार्यकर्ते प्रचारात कोठेही जाहीरपणे दिसत नाहीत़
बीडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली़ तेथेही रिपाइं कार्यकर्ते पहायला मिळाले नाहीत़ याबाबत रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्याशी संपर्क केला असता ते ‘आऊट आॅफ कव्हरेज’ होते़
समजूत काढू
भाजपचे जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड़ सर्जेराव तांदळे म्हणाले, रिपाइं आमचा मित्र पक्ष आहे़ त्यांची नाराजी असू शकते मात्र ते आमच्या कुटुंबातीलच असल्याचे आम्ही मानतो़ त्यांची समजूत काढून प्रचारात सक्रीय करू, असेही तांदळे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यापासून भाजप उमेदवार विनायक मेटे वेगळ्याच तोऱ्यात आहेत़ राष्ट्रवादीचे चार पदाधिकारी फोडून त्यांनी इनकमिंग सुरू तर केले पण मित्रपक्षाची नाराजी दूर करण्यात त्यांना अपयश आले़ त्यामुळे राष्ट्रवादीला हादरे देण्याच्या नादात मेटेंना मित्रपक्षाचाच विसर पडल्याचे दिसून येते़ रिपाइं पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने नाराजी वाढल्याचा सूर आहे़ गाडीला मित्रपक्षाचे झेंडे लावून मेटे फिरत आहेत मात्र स्वाभिमानी शेतकरी आघाडीचा केवळ दांडाच लावण्यात आलेला आहे़ या दांड्यासाठी झेंडाच सापडत नाही, अशी सूत्रांची माहिती आहे़

Web Title: 'Sayant' in Beed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.