शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सयाजी शिंदे घेऊन येत आहेत 'वृक्ष संमेलन'; पहिले संमेलन फुलणार बीडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 17:53 IST

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर-अभिनेता सयाजी शिंदे यांच्यात चर्चा 

ठळक मुद्देसंमेलनाचे जानेवारीअखेर नियोजन प्रत्येक जिल्ह्याला मान देणार 

औरंगाबाद : अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेले पहिले वृक्ष संमेलन मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात जानेवारीअखेरीस होणार आहे. वृक्ष संमेलन ही नवीन संकल्पना शिंदे यांच्या वृक्ष महोत्सवातून पुढे आली असून, त्यांनी याबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी मंगळवारी तासभर चर्चा केली.

अभिनेता सयाजी शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, कदाचित वृक्ष संमेलन ही संकल्पना नवीनच असावी. तीन वर्षांपासून असे संमेलन घेण्याचा विचार होता. वृक्ष लागवड, वृक्ष ओळख, बियाणे आणि पर्यावरणासाठी वृक्षांची आवश्यकता यावर अनुभवी पर्यावरणप्रेमींनी बोलावे. पर्यावरण साहित्यिक तेथे असावेत. हे सगळे विभागातील विद्यार्थ्यांसमोर मांडावे. जेणेकरून त्यांना पर्यावरण आणि वृक्ष लागवड याचे महत्त्व समजेल. मराठवाड्यातील जंगलसंपदा अतिशय कमी आहे. अशा संमेलनातून जर वृक्ष लागवडीला चालना मिळाली, तर निश्चितपणे येणाऱ्या काही वर्षांत विभाग दुष्काळमुक्त होण्यास मदत होऊ शकेल, असे वाटते. 

बियाणे, निसर्ग अन्नसाखळी, अंकुर, फुलपाखरे आणि परागकण याची माहिती अनेकांना नसते. विद्यार्थ्यांना विविध वृक्षांच्या नावाच्या चित्रफिती दाखविण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग, लोकसहभाग, चित्रकला स्पर्धा, संमेलनात स्टॉल उभारणे, वृक्षकथा, गीतांचे आयोजन करण्याबाबत आयुक्त केंद्रेकर यांच्याशी चर्चा केली. आयुक्तांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. त्यांनादेखील पर्यावरण हा विषय आवडतो, त्यामुळे त्यांनी वृक्ष संमेलनाच्या नियोजनाबाबत सर्व काही समजून घेतले. 

प्रत्येक जिल्ह्याला मान देणार प्रत्येक जिल्ह्यात ५० हजार वृक्ष लागवड होऊन त्यांचे संगोपन चांगले होत असल्याचे दिसून आले तर त्या जिल्ह्याला वृक्ष संमेलन घेण्याचा मान देण्यात येईल. विद्यार्थ्यांचा सहभाग, तज्ज्ञांची आवास-निवास व्यवस्था करणे, यासह अनेक लहान-सहान मुद्यांवर आयुक्तांशी चर्चा केली. मराठवाड्यासाठी हा उपक्रम जंगलवाढीसाठी लाभदायी ठरावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :environmentपर्यावरणBeedबीडAurangabadऔरंगाबादpollutionप्रदूषण