शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजास नाही म्हणा! युवकाच्या गळ्याला ३ इंच लांब,१ इंच खोल जखम, बोटे चिरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 20:37 IST

प्लास्टिक सर्जरी करून डॉक्टरांनी त्याचा जीव वाचविला.

औरंगाबाद : स्पर्धा परीक्षा देऊन दुचाकीने घराकडे जाणाऱ्या युवकाच्या गळा नायलॉन मांजाने गंभीररित्या कापला गेला. जळगावरोडवर गुरुवारी दुपारीही घटना घडली. रक्ताने थपथपलेल्या कपड्यासह त्यास जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची मान ३ इंच लांब चिरली. १ इंच खोल जखम झाली. डाव्या हाताची दोन बोटेही कापल्या गेली. त्या जखमेतून ४० एम. एल.रक्त सांडले. प्लास्टिक सर्जरी करून डॉक्टरांनी त्याचा जीव वाचविला. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा ‘नायलॉन मांजा’ची घातकता सर्वांसमोर आली.

ज्ञानेश्वर शिवाजी धोपटे असे त्या युवकाचे नाव आहे. तो आळंद (ता.फुलंब्री) येथील मूळ रहिवासी आहे. तो औरंगाबादेत मित्रांसोबत रूम करून राहत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. जळगावरोडवर सेंट जॉन इंग्लिश स्कूलच्या समोरील रस्त्यावर गुरुवारी दुपारी तो दुचाकीवरून जात असताना अचानक नायलॉन मांजा त्याच्या मानेला चिरून गेला, मांजापासून मान वाचविण्यासाठी त्याने डावा हात पुढे केला तर दोन बोटेही कापली. अशा अवस्थेत त्याने दुचाकी बाजूला घेतली. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी गाड्या बाजूला ठेवून त्यास जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार करून सर्वप्रथम रक्तस्त्राव थांबविला. आकाशवाणी चौकातील हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्या मानेवर प्लास्टिक सर्जरी केली. उपचाराला आणखी थोडा वेळ लागला असता तर त्या युवकाचा प्राणही गेला असता.

पतंग उडविणाऱ्यांवर गुन्हे दाखल कराऑपरेशन करताना मानेला सर्जरी ब्लेडने ३ इंच लांब, १ इंच खोल कापण्यासाठी डॉक्टरांना ४ ते ५ मिनिटे लागतात. पण नायलॉन मांजाने डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत गळा कापल्या गेला. यावरून मांजा किती घातक आहे हे कळते. पतंग उडविणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा. ते अल्पवयीन असतील तर त्यांच्या आई-वडिलांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. जेणेकरून यापुढे कोणाचा गळा चिरू नये.- डॉ. विलास ढाकरे

हात जोडून सांगतो नायलॉन मांजाने पतंग उडवू नकानायलॉन मांजामुळे मुलाचा गळा कापल्या गेला पण डॉक्टरांमुळे त्याला जीवदान मिळाले. पतंग उडविणाऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो की, नायलॉन मांजाने पतंग उडवू नका. साध्या दोऱ्याने उडवा. पतंग विकत घेता येतो, पण गेलेला जीव परत येत नाही.- शिवाजी धोपटे, ज्ञानेश्वर धोपटेचे वडील

प्लास्टिक सर्जरी केलीज्ञानेश्वर धोपटेचा नायलॉन मांजाने गळा चिरला होता. बराच रक्तस्त्राव झाला होता. डॉ. अमित पाटील यांनी त्याच्या मानेवर प्लास्टिक सर्जरी केली. आता त्याची तब्येत ठीक आहे. नायलॉन मांजामुळे अधूनमधून गळा चिरणारे रुग्ण कोणत्या ना कोणत्या रुग्णालयात दाखल होत असतात. नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई व्हावी.- डॉ. शोहब हासमी

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादkiteपतंगCrime Newsगुन्हेगारी