शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणे औरंगाबादेत २०० चार्जिंग स्टेशन; पण कागदावरच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 17:55 IST

चार्जिंग स्टेशन स्मार्ट सिटी कार्यालयापर्यंतच मर्यादित

औरंगाबाद : कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर जास्तीत जास्त वाढविण्याचे धोरण आखले आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांना सबसिडीसुद्धा दिली जात आहे. औरंगाबाद महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात तब्बल २०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची घोषणा सहा महिन्यांपूर्वी केली. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. स्मार्ट सिटीचे कार्यालय वगळता उर्वरित स्टेशन कागदावरच आहेत.

वातावरणीय बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवणार असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने विविध उपाययोजना राबविण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयांनी खरेदी करण्याची सूचना करण्यात आली आहे. १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून ८५ टक्के निधी ई-वाहने, ई-चार्जिंग सेंटर यावर खर्च केला जाईल, असेही जाहीर करण्यात आले होते.

महापालिकेने स्मार्ट सिटीच्या सहकार्याने वातावरणीय बदलाचा परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. स्मार्ट सिटी कार्यालयाने पाच ई-वाहने खरेदी केली असून, महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी १५ व्या वित्त आयोगातून ई-वाहने खरेदी केली जातील. त्यासोबतच ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात २०० ठिकाणी चार्जिंग सेंटर उभारले जातील. महापालिकेच्या कार्यालयापासून त्याची सुरुवात केली जाईल. सर्व सरकारी कार्यालयात ई-चार्जिंग सेंटर राहणार असून पेट्रोल पंप, मॉल, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, व्यापारी संकुल या ठिकाणीही ई-चार्जिंग सेंटर केले जाणार असल्याचे जाहीर केले होते.

स्मार्ट सिटीत ३ स्टेशनसध्या स्मार्ट सिटीच्या कार्यालयात तीन चार्जिंग स्टेशन उभारले आहेत. त्याचप्रमाणे मध्यवर्ती जकात नाका येथील पेट्रोल पंपावरही चार्जिंगची सोय आहे. चार्जिंगचे दर काय असतील, हे नंतर ठरणार आहे. मात्र सर्वसामान्यांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रियाही मनपाने सुरू केली नाही.

वाहन संख्या वाढू लागलीपेट्रोल, डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे अनेक नागरिक ई-दुचाकीचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्याचप्रमाणे चारचाकी वाहनांची संख्याही शहरात बऱ्यापैकी वाढली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन असणे आवश्यक आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका