शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सवन वाळू उपसा; तलाठी, मंडल अधिकारी निलंबित, तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यास नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:29 IST

लोकमत इम्पॅक्ट: कलेक्टर स्वत: सकाळीच सवनला; वाळूघाट केला सील, १ लाख ब्रास वाळू उपसल्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : शिवना नदीच्या पात्रातील सवन या राखीव वाळूपट्ट्यातून कंत्राटापेक्षा अधिक वाळू उपसा केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणताच, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पथकसह बुधवारी सकाळी तेथे पोहोचले. परिस्थिती पाहून त्यांनी जागेवरच संबंधित तलाठी, मंडल अधिकारी यांना निलंबित केले तर तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यास ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ९ हजार ६०० ब्रास वाळू उपसण्याचा ठेका ६३ लाख ६० हजार रुपयांच्या रॉयल्टीने घेतला. परंतु त्या पट्ट्यातून बेकायदेशीररीत्या जास्तीची वाळू उपसून ती खुल्या बाजारात बोगस चालानच्या आधारे विक्री केली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रकाशित केले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सकाळीच वाळूपट्टा गाठला. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना सोबत घेऊन त्यांनी वस्तुस्थिती मोबाईलमध्ये कैद केल्यानंतर वाळूपट्टा सील करून पंचनामा केला.

ईटीएस मोजणी करून बेकायदेशीर किती वाळू उपसली, त्याचे मूल्यांकन करण्याचे आदेश स्वामी यांनी दिले. सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. एक नावाला लावला आहे. रजिस्टर नाही. जे आहे ते प्रमाणित नाही. मजिप्राचा अभियंता १:३० वाजता आला. त्याने पंचनाम्यावर सह्या केल्या नाहीत. वाळू ठेका तुमच्या योजनेसाठी दिलेला आहे तेथे तुमचा अभियंता का नेमला नाही? किती वाहने गेली? वाळू कुठे गेली? याची नोंद कुठे ठेवली आहे काय, अशी प्रश्नांची सरबत्तीच गोरड यांनी केली. नेमलेल्या कंत्राटदारांना सूचना दिल्या होत्या, असे अभियंत्याने मोघम उत्तर दिले. पंचनाम्यात याची नोंद घेतली असून प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांचे निलंबन करण्याचीही नोंद पंचनाम्यात झाली. घाटाची मोजणी झाली. ईटीएस मोजणी पूर्ण केली आहे. १ ऐवजी १० मीटरपर्यंत वाळूचे उत्खनन केले आहे. ६५०० ब्रास वाळू बुधवारी पथकाने जप्त केली. ९६०० ब्रास वाळू जीवन प्राधिकरणाला हवी होती, असे पथकप्रमुखांनी सांगितले.

दोघे निलंबित, दोघांना नोटीसतलाठी उज्ज्वला ठोंबरे, मंडल अधिकारी सुभाष वाघ यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. तहसीलदार नवनाथ वाघवाड व उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. जीवन प्राधिकरण मोजणीचा अहवाल येताच किती वाळू जास्तीची उपसली, त्याचा दंड प्राधिकरणावर लावला जाणार आहे. हा सगळा प्रकार पाणीपुरवठा सचिवांकडे लेखी पाठवू.दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

गौण खनिज अधिकाऱ्याची बदलीगौण खनिज अधिकारी किशोर घोडके यांची मंगळवारी कोल्हापूरला बदली झाली, मात्र त्यांना कार्यमुक्त केले नव्हते. परंतु त्यांनी स्वत:ला शासनाकडूनच कार्यमुक्त करवून घेतले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घोडके यांना चांगलेच फैलावर घेतले.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागsandवाळूchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर