साबणासहित ट्रक लांबविणारा जेरबंद
By Admin | Updated: October 17, 2014 23:56 IST2014-10-17T23:41:47+5:302014-10-17T23:56:37+5:30
वाळूज महानगर : १५ लाखांची डिटर्जंट पावडर, साबण व १२ लाख रुपयांचा ट्रक पळविणाऱ्या चोरट्यास काल रात्री एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले.

साबणासहित ट्रक लांबविणारा जेरबंद
वाळूज महानगर : १५ लाखांची डिटर्जंट पावडर, साबण व १२ लाख रुपयांचा ट्रक पळविणाऱ्या चोरट्यास काल रात्री एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले.
याविषयी पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी दिलेली माहिती अशी की, दीव- दमणमधील सेल्व्हासा येथून ट्रकमध्ये १४ लाख ७२ हजार ७१२ रुपये किमतीची डिटर्जंट पावडर व साबण भरून ट्रकचालक सुभाष पारखे हा वाळूज औद्योगिक क्षेत्रातील हिंदुस्तान लिव्हर कंपनीच्या गोदामात देण्यासाठी आला होता. १५ आॅक्टोबरला मतदान असल्यामुळे कंपनीचे गोदाम बंद होते. सुरक्षारक्षकाने त्यास दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. त्यामुळे सुभाषने मालाची बिल्टी फाडून हा ट्रक पंढरपुरातील राजपूत पेट्रोल पंपासमोर उभा करून तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आला असता त्यास ट्रक गायब झाल्याचे लक्षात आले. त्याने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.