शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

जंजाळा, वेताळवाडी किल्ला परिसरात सागवान तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:50 AM

श्यामकुमार पुरे सिल्लोड : सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील जंजाळा, वेताळवाडी डोंगर रांगातील राखीव वनक्षेत्रातून मौल्यवान सागवान लाकडांची तस्करी सुरु असून याकडे वन विभागाचे दुर्लक्ष आहे की त्यांच्या सहमतीने हा गोरखधंदा सुरु आहे, हे मात्र कोडेच आहे.

श्यामकुमार पुरेसिल्लोड : सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील जंजाळा, वेताळवाडी डोंगर रांगातील राखीव वनक्षेत्रातून मौल्यवान सागवान लाकडांची तस्करी सुरु असून याकडे वन विभागाचे दुर्लक्ष आहे की त्यांच्या सहमतीने हा गोरखधंदा सुरु आहे, हे मात्र कोडेच आहे.रात्री -अपरात्री या जंगलातील सागवानांची मोठमोठी झाडे कापून त्याची विल्हेवाट लावली जात आहे. सागवान लाकडांपासून बनविलेल्या टेबल, खुर्ची व इतर साहित्याला मोठी मागणी असते. नेमका हाच धागा पकडून १५ ते २० जणांच्या टोळीने हा धंदा सुरु केला आहे. जळगाव, बºहाणपूर, औरंगाबाद, पाचोरा येथे या लाकडांची विक्री केल्या जाते. दिवसेंदिवस सागवानांची झाडे तोडली जात असल्याने या डोंगरातून सागवान नामशेष झाल्यास आश्चर्य वाटू नये. सिल्लोड तालुक्यातील नानेगाव हे या अवैध धंद्याचे केंद्रबिंदू आहे.नानेगाव, जंजाळा हे गाव सिल्लोड तालुक्यात येते, मात्र या गावाला लागून जंजाळा, केळगाव, मुर्डेश्वर, वेताळवाडी किल्ला आहे. या शिवाय जरंडी, सोयगाव वनपरिक्षेत्रात ९ हजार ३९९ हेक्टर घनदाट अरण्य आहे. जिल्ह्यापासून या डोंगराचे अंतर लांब असल्याने अधिकारी इकडे फिरकत नाही. याचा फायदा घेऊन सागवान तस्करी करणाºया टोळ्या या परिसरात कार्यरत आहेत.दिवसा झाडांचा शोध घेणे व निशाणी करून प्रचलित कटिंग मशीनद्वारे रात्री हिरवी सागवान झाडे तोडण्याची तस्करांची पद्धत आहे.चंदन नामशेषसिल्लोड, सोयगाव, अजिंठा वन परिक्षेत्रातील नानेगाव, जंजाळा, भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार ही गावे चंदन तस्करांची गावे म्हणून ओखळली जातात. अनेक कारवाया करूनही या परिसरातील तस्करांवर वन विभाग अंकुश लावू शकला नाही. परिणामी या वनपरिक्षेत्रातील चंदन नामशेष झाले आहे. हीच परिस्थिती राहिली तर आता सागवान नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही.जम्बो कारवाईची गरजसध्या सागवान तस्कर कुºहाडी, रायफल, शस्र घेऊन डोंगरात वावरतात. यामुळे भीती अन हप्त्याची लालसा यामुळे काही कर्मचारी जीव वाचवून नोकरी करतात. परिणामी तस्करांच्या दहशतीने कुणी याविरोधात आवाज उठवत नाही. त्यामुळे मोठा फौजफाटा घेऊन जम्बो कारवाई केल्यास सागवान वाचू शकेल.नानेगावात मशीनद्वारे होते कटाईजंगलातून चोरून आणलेली लाकडे नानेगावात साठविली जातात. या गावात घराघरात २५ ते ३० कटाई मशीन आहेत. त्याद्वारे खुलेआम विनापरवाना रस्त्यावर सागवान कापून त्याचे फर्निचर तयार करून जळगाव, औरंगाबाद, विदर्भ, खान्देशमध्ये विक्री केल्या जाते.आड रस्त्याने जातात वाहनेकटाई करून तोड केलेले सागवान, त्याचप्रमाणे नानेगावात फर्निचर तयार करून ते ट्रकद्वारे अजिंठा, कन्नड तालुका, पाचोरा मार्गे, बाबरा, अंधारीमार्गे आड रस्त्याने पास केले जातात.