फटाकेमुक्त दिवाळीतून ४८ लाखांची बचत
By Admin | Updated: October 27, 2014 00:11 IST2014-10-26T23:55:19+5:302014-10-27T00:11:09+5:30
लातूर : महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मुलन समितीच्या वतीने प्रदूषणमुक्त व फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला होता़

फटाकेमुक्त दिवाळीतून ४८ लाखांची बचत
लातूर : महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मुलन समितीच्या वतीने प्रदूषणमुक्त व फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला होता़ या माध्यमातून जिल्हाभरातील २४ हजार नागरिकांतून संकल्पपत्रे भरुन घेण्यात आली़ याबाबतचे ५५ शाळांचे अहवाल जिल्हा अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे सादर करण्यात आले असून, या फटाकेमुक्त दिवाळीतून यावर्षी २६ आॅक्टोबरपर्यंत ४८ लाखांची बचत झाली आहे़
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा शाखा लातूरच्या वतीने जिल्हाभरातील ६५ शाळांमध्ये फटाकेमुक्त दिवाळी साजरा करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली़ दीपावलीतील फटाके व शोभेच्या दारुची खरेदी आणि नंतर वापर हा आनंदाचा भाग मानला जातो़ परंतु, सुजाण नागरिक याबाबत विचार करु लागले आहेत़ यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, अपघाताने भाजणे, आग लागणे, वृद्ध, आजारी व परिसरातील विद्यार्थ्यांना त्रास होणे़ यामुळे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करुन या पैशातून पुस्तके, खेळणी, किल्ल्यासाठीची साधनसामुग्री घेण्याचा संकल्प करावा़ तसेच गरजूंना मदत करण्याचा संकल्प करावा, अशी जनजागृती करण्यात आली़ तसेच शहरातील व्यापाऱ्यांकडेही जावून या ६५ शाळेतील विद्यार्थ्यांकडून जनजागृती करण्याचे काम सुरु केले़ तसेच शहरातील या व्यापाऱ्यांकडून पाच हजार जणांकडून संकल्पपत्रे भरुन घेतली़ परंतु गतवर्षीच्या प्रमाणात यावर्षी परीक्षा, निवडणुकीचा कालावधी आला असल्याने जास्तीत जास्त नागरिकांकडून संकल्पपत्रे भरुन घेण्याचा उद्देश परिपूर्ण झाला नाही़ गतवर्षी या जनजागृतीच्या माध्यमातून फटाकेमुक्त दिवाळी साजरी केल्याने एक कोटीची बचत झाली होती़ परंतु दिवसेंदिवस नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असल्याने त्याचा फायदा होत असल्याचे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी सांगितले़
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या जनजागृतीला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी केला. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात अंनिसच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी जिल्ह्यातील ६५ शाळांच्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीमध्ये ५५ शाळांचे अहवाल जिल्हा कार्यकारिणीकडे जमा करण्यात आले आहेत़
४यामध्ये लातूर, चाकूर व मुरुडचे योगदान मोठ्या प्रमाणात लाभली असल्याचे समोर आले आहे़ उर्वरित शाळांचेही अहवाल एक-दोन दिवसात जिल्हा कार्यकारिणीकडे जमा होवून बचतीचा आकडा आणखी वाढणार असल्याचा विश्वास अंनिसच्या लातूर शाखेच्या वतीने व्यक्त करण्यात आला़
४महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. त्याला यश आले आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्ह्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी अंनिसच्या फटाके मुक्त व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्याचा संकल्प प्रभातफेरीत सहभाग घेतला होता़ या फेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये पणत्या घेऊन शहरातील मध्यवर्ती भागातून फटाकेमुक्त दिवाळी साजरा करण्याचा संकल्प जनतेपर्यंत पोहोचविला़ त्यामुळे प्रभातफेरीचा मोठा परिणाम झाल्याने लाखोंची बचत झाली़