हरणाच्या पाडसाला कुत्र्याच्या हल्ल्यातून वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:04 IST2021-05-05T04:04:51+5:302021-05-05T04:04:51+5:30
रविवारी सायंकाळच्या सुमारास हरणांच्या कळपातील आईपासून भरकटलेले एक हरणाचे पाडस बाबूलाल दीपलाल छोटे यांच्या चिंचोली शिवारातील शेतात आले ...

हरणाच्या पाडसाला कुत्र्याच्या हल्ल्यातून वाचविले
रविवारी सायंकाळच्या सुमारास हरणांच्या कळपातील आईपासून भरकटलेले एक हरणाचे पाडस बाबूलाल दीपलाल छोटे यांच्या चिंचोली शिवारातील शेतात आले होते. तेथे ते कुत्र्याच्या तावडीत सापडले. कुत्र्याने त्याचा पाठलाग सुरू केला. ही बाब शेतकरी बाबूलाल छोटे व त्यांच्या दोन लहान मुलींनी पाहिली. त्यांनी प्रयत्न करुन कुत्र्याच्या तावडीतून त्या पिल्लाला वाचविले. त्यानंतर ही माहिती त्यांनी रुग्णवाहिका चालक प्रभाकर बोडखे यांना दिली. त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन करुन माहिती दिली. मात्र, रविवार असल्याने आजच्या दिवस सांभाळा उद्या येऊ, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, सोमवारीही वनविभागाचे कर्मचारी आलेच नव्हते. वनविभागाच्या या हालगर्जीपणामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
फोटो : कुत्र्यांच्या तावडीतून वाचविलेले हरणाच्या पाडसासोबत शेतकरी बाबूलाल छोटे यांची मुलगी.
030521\dilip misal_img-20210503-wa0054_1.jpg
कुत्र्यांच्या तावडितून वाचविलेले हरणाच्या पाडसासोबत शेतकरी बाबूलाल छोटे यांची मुलगी.