स्वस्त धान्य दुकानदार आंदोलनाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 23:51 IST2017-07-28T23:51:57+5:302017-07-28T23:51:57+5:30

कळमनुरी : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने २८ जुलै रोजी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

savasata-dhaanaya-daukaanadaara-andaolanaacayaa-tayaaraita | स्वस्त धान्य दुकानदार आंदोलनाच्या तयारीत

स्वस्त धान्य दुकानदार आंदोलनाच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने २८ जुलै रोजी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
राज्यात अन्न महामंडळ स्थापन करून स्वस्त धान्य दुकानदारांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या, धान्यांची उतराई रक्कम घेण्यात येऊ नये, सर्व योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना धान्याची उपलब्धता करून प्रमाणानुसार पूर्ण कोटा मिळण्याची तरतूद करावी, वितरणातून होणाºया तुटीला मान्यता द्यावी, परवानाधारकास मदतनिस नेमण्याची परवानगी द्यावी आदी मागण्या मान्य न झाल्यास १ आॅगस्टपासून धान्य व केरोसिन वितरणावर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. प्रतीभा गोरे यांना देण्यात आले. यावेळी नागोराव करंडे, बाबूराव हनमंते, सादेक नाईक, म. ताहेर, साहेबराव पतंगे, प्रकाश वर्मा, अविनाश करंडे आदी उपस्थित होते.

Web Title: savasata-dhaanaya-daukaanadaara-andaolanaacayaa-tayaaraita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.