तुळजापूरला मिळणार सव्वाकोटींचे अनुदान
By Admin | Updated: March 1, 2016 00:39 IST2016-03-01T00:18:25+5:302016-03-01T00:39:13+5:30
तुळजापूर : यात्रा स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या यात्रेकरूंकडून वसूल करण्यात येत असलेला यात्रा कर बंद करून शासनाने सदर नगर परिषदांना यात्रा कर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे

तुळजापूरला मिळणार सव्वाकोटींचे अनुदान
तुळजापूर : यात्रा स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या यात्रेकरूंकडून वसूल करण्यात येत असलेला यात्रा कर बंद करून शासनाने सदर नगर परिषदांना यात्रा कर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार तुळजापूर नगर परिषदेला १ कोटी २७ लाख ७७ हजार १०९ रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
तुळजापूर येथे होणाऱ्या यात्रेसाठी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची लाखोंची हजेरी असते. या यात्रेकरूंकडून यात्रा स्थळी येण्याबद्दलचा कर घेण्यात येत होता. मात्र, हा कर रद्द करून नगर परिषदांना यात्राकर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. यापूर्वी २०१५-१६ करिता यात्राकर अनुदान वितरित करण्यात आले होते. अर्थसंकल्पित झालेल्या निधीपैकी आता नव्वद टक्के निधी वितरित करण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली असून, याअंतर्गत तुळजापूर नगर परिषदेला ‘अर्थसंकल्प वितरण प्रणाली’वर वरीलप्रमाणे निधी वितरित करण्याचा शासनादेश जारी करण्यात आला आहे. (वार्ताहर)