स्वच्छता कर्मचाºयांचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:34 IST2017-07-29T00:34:54+5:302017-07-29T00:34:54+5:30
नांदेड: चार महिन्यांचे थकित वेतन यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी २४ जुलैपासून सुरु असलेले स्वच्छता कर्मचाºयांचे आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आले़ येत्या आठ दिवसांत स्वच्छता कर्मचाºयांचे थकित वेतन अदा करण्याचे आश्वासन मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले़

स्वच्छता कर्मचाºयांचे आंदोलन मागे
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: चार महिन्यांचे थकित वेतन यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी २४ जुलैपासून सुरु असलेले स्वच्छता कर्मचाºयांचे आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आले़ येत्या आठ दिवसांत स्वच्छता कर्मचाºयांचे थकित वेतन अदा करण्याचे आश्वासन मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले़
स्वच्छता कर्मचाºयांचे चार महिन्यांपासूनचे वेतन थकित आहे़ कर्मचाºयांसाठी किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी, आठवड्यातून एक सुटी द्यावी, कामगारांना गमबुट, हॅन्डग्लोज, मास्क यासह सुरक्षाविषयक साहित्य पुरवावे, कमी केलेल्या कामगारांना कामावर परत घ्यावे या मागण्यांसाठी २४ जुलैपासून स्वच्छता कर्मचाºयांनी साखळी उपोषण सुरु केले होते़ या कंत्राटी कर्मचाºयांची मोठी लूट केली जात असल्याचा आरोप नगरपालिका, महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनने केला होता़
दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होत चालले होते़ शुक्रवारी रेल्वेस्थानक परिसरात स्वच्छता कर्मचाºयांनी पुन्हा आंदोलन सुरु केले़
सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली़ त्यानंतर येत्या आठ दिवसांत थकित वेतनाचा प्रश्न निकाली काढण्यात येईल़, त्याचबरोबर कामावरुन कमी केलेल्या सर्व कामगारांना परत कामावर घेतले जाईल, असे आश्वासन मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले़ त्यानंतर स्वच्छता कर्मचाºयांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला़