सत्संग प्रतिष्ठानतर्फे ७०० वारकऱ्यांची वारी

By Admin | Updated: July 15, 2016 00:50 IST2016-07-15T00:24:44+5:302016-07-15T00:50:35+5:30

लातूर : पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी शहरातील श्री सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने मोफत दर्शनाची सोय करण्यात आली आहे़

Satsang Pratishthan has issued 700 warrants | सत्संग प्रतिष्ठानतर्फे ७०० वारकऱ्यांची वारी

सत्संग प्रतिष्ठानतर्फे ७०० वारकऱ्यांची वारी


लातूर : पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी शहरातील श्री सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने मोफत दर्शनाची सोय करण्यात आली आहे़ गेल्या पंधरा वर्षांपासून ही सेवा सुरु आहे़ गुरूवारी सकाळी ११ वा़ लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातून विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना महापौर दीपक सूळ यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला़
पंधरा वर्षांपासून श्री सत्संग प्रतिष्ठान लातूरच्या वतीने अध्यक्ष गोविंदलाल पारीख, सचिव चंदू लड्डा, कार्याध्यक्ष रमेशचंद्र भुतडा, उपाध्यक्ष दत्ता लोखंडे, कोषाध्यक्ष रामेश्वर भराडीया यांनी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ या प्रतिष्ठानच्या वतीने विठ्ठल भक्तांसाठी ११ बसेसचे नियोजन मोफत करण्यात आले आहे़ तसेच भाविकांच्या फराळाची सोय व्हावी यासाठी सोबत भोजनाचे पॉकेट व केळींची सोय करण्यात आली
आहे़
गुरुवारी मध्यवर्ती बसस्थानकातून या भाविकांना निरोप देण्यासाठी महापौर दीपक सूळ, उपमहापौर चाँदपाशा घावटी, मनपा विरोधी पक्षनेते मकरंद सावे, विक्रम गोजमगुंडे, रेणुकाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवराज मोटेगावकर, उद्योगपती बालकिशन मुंदडा, द्वारकादास शामकुमारचे तुकाराम पाटील, दिलीप माने, स्थानक प्रमुख बलभीम पाटील, व्यंकट बिराजदार, नवलकिशोर सारडा, बालाजी बारबोले आदी उपस्थित होते़

Web Title: Satsang Pratishthan has issued 700 warrants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.