सतीश चव्हाण यांच्या जिल्ह्यात प्रचारफेऱ्या
By Admin | Updated: June 12, 2014 01:34 IST2014-06-12T01:20:38+5:302014-06-12T01:34:37+5:30
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यात मतदारांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत.

सतीश चव्हाण यांच्या जिल्ह्यात प्रचारफेऱ्या
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यात प्रचाराला गती देऊन ठिकठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत.
पैठण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे कार्यकर्ते आ. सतीश चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेणारी पूर्तता पुस्तिका व जाहीरनामा पदवीधरांपर्यंत पोहोचवीत आहेत. पैठण येथे आ. सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत पदवीधरांचा मेळावा झाला. पैठण शहरासह बिडकीन, पाचोड, लोहगाव, विहामांडवा आदी सर्कलमध्येदेखील त्यांची फेरी झाली. आ. सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी प्रा. पी.आर. थोटे, डॉ. राजेश करपे यांच्यासह डॉ. गणेश मोहिते, रमेश झारगड, प्रल्हाद नरवडे, संदीप कासाटे, नितीन पोकळे, रमेश ठोंबरे, कैलास पतंगे, पप्पू जाधव, ज्ञानेश्वर गोडे आदी परिश्रम घेत आहेत.
सिल्लोडमध्ये यशवंत महाविद्यालय, तसेच इंद्रराज महाविद्यालयात प्रचार प्रमुख नितीन बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय जाधव पाटील, सिल्लोड-सोयगाव विधानसभा अध्यक्ष राजूमियाँ देशमुख, विनयन पाटील, प्राचार्य अशोक पंडित, प्राचार्य साबळे, एकनाथ डकले, शिवराम साखळे, अंकुशराव पालोदकर, जी.बी. दौड, आकाश पांढरे, मुरलीधर दापके आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन जाधव यांनी केले. या बैठकीस पदवीधरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वैजापूर येथे आ. सतीश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवीधरांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विश्वास पाटील, अप्पासाहेब पाटील, दिलीप बोरनारे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील निकम, राजूसिंह राजपूत, जि.प. सदस्य दिनकर पवार, प्रतापराव धोर्डे, पं.स. सदस्य आधुडे, साहेबराव पवार, बाळासाहेब भोसले, राजाभाऊ मगर, रावसाहेब जगताप, पंढरीनाथ पवार, अबलचंद वेताळ, रझा पठाण आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर जाधव यांनी केले.
देवगाव रंगारी येथे बैठक
देवगाव रंगारी येथील श्री गणेश विद्यालयात पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी बैठक घेण्यात येऊन परिसरातील मतदारांना डॉ. प्रकाश भांडवलदार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उमेदवार सतीश चव्हाण यांनी केलेल्या कामांची माहिती देऊन पुढील पाच वर्षांसाठी निवडून देण्याची विनंती केली.
याप्रसंगी गजानन सुराशे, कारभारी भांडवलदार, राजकुमार गंगवाल, मुख्याध्यापक एस.पी. जवळकर, देवीदास जाधव, विष्णू काळे, रघुनाथ चेअरमन, प्रा. शिवराज डुमणे, प्राचार्य पाथरे, पारधी सर, बी.जी. शिंदे आदी उपस्थित होते.