निवडणुकीत सातव यांचा ४९ लाख तर वानखेडे यांचा ४५ लाखांचा खर्च

By Admin | Updated: June 19, 2014 00:21 IST2014-06-19T00:05:31+5:302014-06-19T00:21:09+5:30

हिंगोली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खा. राजीव सातव यांचा ४९ लाख १७ हजार ७२३ रुपयांचा खर्च झाला

Satav's 49 lakhs and Wankhede's 45 lakhs expenditure in the elections | निवडणुकीत सातव यांचा ४९ लाख तर वानखेडे यांचा ४५ लाखांचा खर्च

निवडणुकीत सातव यांचा ४९ लाख तर वानखेडे यांचा ४५ लाखांचा खर्च

हिंगोली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खा. राजीव सातव यांचा ४९ लाख १७ हजार ७२३ रुपयांचा खर्च झाला असून, शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा ४५ लाख ५४ हजार ८०८ रुपयांचा खर्च झाल्याची माहिती बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे खर्च सादर केल्यानंतर या खर्चाची पडताळणी करण्यात आली. त्या अनुषंगाने बुधवारी हिंगोली लोकसभेचे खर्च विभागाचे निरीक्षक जी. प्रकाश हिंगोलीत आले होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीअंती निवडणुकीतील उमेदवारांचे खर्च निश्चित करण्यात आले. याबाबतची अंतिम आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर देण्यात आली. त्यानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खा. राजीव सातव यांचा या निवडणुकीत एकूण ४९ लाख १७ हजार ७२३ रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामध्ये २२ लाख ८३ हजार रुपये प्रचारासाठी वापरण्यात आलेल्या वाहनांवर खर्च करण्यात आले असून, ६७ हजार ६६८ रुपये प्रसारमाध्यमांमधील प्रचार कार्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. तसेच २५ लाख ६७ हजार ५५ रुपये जाहीर सभा, मेळावे व मिरवणुकांसाठी खर्च करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहेत.
शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा या निवडणुकीत ४५ लाख ५४ हजार ८०८ रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामध्ये प्रचार कार्यासाठी वापरलेल्या वाहनांकरिता १८ लाख २४ हजार २१६ रुपये खर्च करण्यात आले असून, प्रचार-प्रतिनिधी यांच्यासाठी १ लाख ८७ हजार ४०० रुपये खर्च करण्यात आला आहे. तसेच २५ लाख ४३ हजार १९२ रुपये जाहीर सभा, मेळावे व मिरवणुकांसाठी खर्च करण्यात आले असल्याचे यासंदर्भातील विवरण पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. अन्य उमेदवारांमध्ये बसपाचे चुन्नीलाल जाधव यांचा ७ लाख ८९ हजार ३०८ रुपये तर माकपचे डी.बी.नाईक यांचा ८ लाख ३२ हजार ४३४ रुपयांचा खर्च झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Satav's 49 lakhs and Wankhede's 45 lakhs expenditure in the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.