स्ट्रक्चरल आॅडीटला महानगरपालिकेचा खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 23:50 IST2017-07-27T23:49:04+5:302017-07-27T23:50:15+5:30
परभणी : शहरातील धोकादायक इमारती शोधण्यासाठी केले जाणारे स्ट्रक्चरल आॅडीट मागील काही वर्षांपासून झाले नाही़ परिणामी धोकादायक इमारतींवर केल्या जाणाºया कारवाईलाही ब्रेक लागला आहे़

स्ट्रक्चरल आॅडीटला महानगरपालिकेचा खो
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील धोकादायक इमारती शोधण्यासाठी केले जाणारे स्ट्रक्चरल आॅडीट मागील काही वर्षांपासून झाले नाही़ परिणामी धोकादायक इमारतींवर केल्या जाणाºया कारवाईलाही ब्रेक लागला आहे़
दोन दिवसांपूर्वी मुंबईत इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर परभणी शहरात किती इमारती धोकादायक आहेत? याची माहिती घेतली़ धोकादायक इमारतींच्या शोधण्यासाठी ठराविक कालावधीमध्ये शहरात स्ट्रक्चरल आॅडीट करणे आवश्यक आहे़ या अनुषंगाने महापालिकेतील नगररचना विभागात नगररचनाकार शिवाजी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, मी दोन वर्षांपासून येथे कार्यरत आहे़ परंतु, या काळात स्ट्रक्चरल आॅडीट झाले नाही़ शहरामधील प्रत्येक प्रभाग समितीनिहाय बांधकामांवर लक्ष ठेवले जाते़ ज्या इमारती ३० वर्षांपूर्वीच्या आहेत, अशा इमारत मालकांनाच नोटीस देवून इमारतीचे आॅडीट करून घेण्याचे कळविले जाते़ त्यामुळे मनपाकडे एकत्रित धोकादायक इमारतींची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले़ शहरामध्ये जुन्या वसाहतीत काही घरे धोकादायक आहेत़
विशेष म्हणजे पोलिसांच्या शासकीय निवासस्थानांमध्येच अनेक घरेही धोकादायक अवस्थेत आहेत़ ही घरे जमीनदोस्त करणे बंधनकारक आहे़ परंतु, अर्धवट पडलेल्या अवस्थेतील ही घरे आजही उभी आहेत़
अतिवृष्टी झाल्यास किंवा अन्य कारणाने ही घरे कोसळून धोका निर्माण होवू शकतो़ परंतु, महापालिकेने या संदर्भात पावले उचलली नसल्याचे दिसत आहे़