शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

सातारा-देवळाई परिसर चार वर्षांनंतरही विकासापासून दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 18:20 IST

महानगरपालिकेत समाविष्ट होऊन पाच वर्षांकडे वाटचाल होत असलेल्या सातारा-देवळाई परिसरात काहीही बदल झालेला नाही. ग्रामपंचायतीच्या साधनावरच मनपाची मदार आहे. 

ठळक मुद्दे रस्ते, पाणी, मलनिस्सारण वाहिनीसाठी महापालिकेकडून आश्वासनांची खैरात

- साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : सातारा-देवळाई चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समाविष्ट होऊनदेखील मनपा प्रशासन कोणत्याही ठोस भूमिकेवर नसल्याने या भागातील रहिवाशांची फरपट सुरू आहे. मूलभूत सुविधांसाठी नागरिकांनी मनपाकडे पाठपुरावा केला. आंदोलन केले; परंतु त्यांच्या आंदोलनाला चिरडण्यात आले. दरवेळी केवळ आश्वासनांची बोळवण केली जात आहे. प्रत्यक्षात सुविधा पुरविण्यात येत नाहीत. ‘साताऱ्याची तऱ्हा’ या मालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात दडलेल्या प्रश्नांना ‘लोकमत’मधून वाचा फोडण्याचा हा प्रयत्न.

सातारा-देवळाई या दोन्ही गावांतील परिसरातील वाढत्या लोकसंख्येनुसार सेवा-सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायती अपुऱ्या ठरत असल्याने सातारा-देवळाई ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करून नगर परिषद स्थापन करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना बदल होईल असा आशावाद निर्माण झाला होता. २५ वॉर्डांची रचना  करून निवडणुकीच्या तयारीला लागलेली नगर परिषद राजकीय हेतूपोटी रद्द करून मनपात समाविष्ट करण्यात आली. त्यावेळी नागरिकांनी विरोध दर्शविला; परंतु त्याचा फायदा झाला नाही. नगर परिषदेकडूनही तुम्हाला सेवा-सुविधा पुरविल्या जाऊ शकत नाहीत. मनपाच्या कार्यक्षेत्रालगत असल्याने विकासासाठी सोयीचे ठरणार आहे, असे नागरिकांना राजकीय नेत्यांनी सांगितले. २५ वॉर्डांचे फक्त दोनच वॉर्ड तयार झाले आणि निवडणुका पार पडल्या; परंतु आतापर्यंत एकाही प्रश्नाची सोडवणूक मनपाने केलेली नाही.

शिष्टमंडळाला आश्वासनांची खैरातगत चार वर्षांपासून सतत भांडणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण मनपा आयुक्त व महापौर यांच्याकडून झालेले नाही. ग्रामपंचायतीच्या काळातील यंत्रणेवरच सर्व काही आजही सुरू आहे. आठवड्यात नागरिकांचे एक शिष्टमंडळ निवेदन घेऊन जाते आणि फक्त आश्वासनांची खैरात घेऊन येते. प्रत्यक्षात काम करण्यावर ठेकेदार अथवा प्रतिनिधीदेखील लक्ष देत नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर आहे.  पाच वर्षांत खासदार व आमदार निधी या भागातच खर्च झाला नसल्याने एकही नवीन काम झाले नाही. ग्रामपंचायतीच्या काळात मोफत टँकरचे पाणी नागरिकांना मिळत होते. मनपात आल्यावर त्या टँकरच्या पाण्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे नागरिकांत मनपाविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. पैठण रोड महानुभव आश्रम ते देवळाईपर्यंत एकाही कॉलनीचा कायापालट करण्यावर लक्ष देण्यात आलेले नाही. खेड्यातून शहरात आल्यावर बदल होईल, असे स्वप्न नागरिकांनी बाळगले होते. चार वर्षांनंतरही त्याची पूर्तता झालेली दिसत नाही. किरकोळ प्रश्नांसाठी जनआंदोलनाशिवाय जनतेला दुसरा पर्याय राहिलेला नाही. अजून किती दिवस विकासापासून कोसोदूर ठेवणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

रेंगाळलेले प्रश्न- पाऊणलाखाच्या वर लोकसंख्या- चार वर्षांत ठोस कामाची पूर्तता नाही- रस्त्यांची कामे मंजूर; पण कासवगतीने सुरू- टोलेजंग घरे बांधली; परंतु सेवा-सुविधांपासून कोसोदूर- पाण्यासाठी आजही नागरिकांची भटकंती

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधी