सातारा येथील खंडोबा मंदिराच्या कामाचा मुहूर्त अडकला टेंडरमध्ये

By Admin | Updated: April 24, 2016 00:11 IST2016-04-24T00:07:15+5:302016-04-24T00:11:43+5:30

औरंगाबाद : सातारा येथील पुरातन खंडोबा मंदिराची दीपमाळ, मुलामा तसेच इतर कामांसाठी १ कोटी १३ लाखांचा निधी २०१५ मध्ये मंजूर होऊनही २०१६ मध्ये फक्त टेंडर बोलावण्याचा सोपस्कार सुरू आहे.

In Satara, the building of the Khandoba temple is located in a stalking tender | सातारा येथील खंडोबा मंदिराच्या कामाचा मुहूर्त अडकला टेंडरमध्ये

सातारा येथील खंडोबा मंदिराच्या कामाचा मुहूर्त अडकला टेंडरमध्ये

औरंगाबाद : सातारा येथील पुरातन खंडोबा मंदिराची दीपमाळ, मुलामा तसेच इतर कामांसाठी १ कोटी १३ लाखांचा निधी २०१५ मध्ये मंजूर होऊनही २०१६ मध्ये फक्त टेंडर बोलावण्याचा सोपस्कार सुरू आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळाही पुन्हा मंदिर व दीपमाळ झीजचे कारण ठरणार आहे, अशी खंत ट्रस्ट व भाविकांसह ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.
सातारा खंडोबा मंदिराचे निर्माण अहिल्यादेवी होळकर यांनी केले असून, चंपाषष्ठीला मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या खंडोबा मंदिराच्या समोर असलेल्या दीपमाळीचे दिवे प्रदूषण व पर्यावरणातील परिणामाने ठिसूळ होऊन तुटून पडले असल्याने नुकसान झाले आहे. या मंदिराची देखभाल पुरातत्व विभागाकडे असल्याने मंदिर ट्रस्टला येथे स्वत:हून काहीही बदल करणे शक्य नाही. मंदिरासाठी एक सुरक्षारक्षक पुरातत्व विभागाकडून नियुक्त केला आहे, दीपमाळीच्या निर्माणासाठी एक महिनाभर मंदिराचे प्रवेशद्वार बंद ठेवून भाविकांना बाजूच्या दरवाज्याने मंदिरात प्रवेश देण्यात आला होता.
यात्रेदरम्यान स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता त्यावेळी मंदिराचे काम त्वरित करणार त्यामुळे उपोषण करू नये असे सुचविले होते; परंतु मार्च अँड संपला निवडणुका संपल्या तरीदेखील मंदिराच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही.
यात्रेदरम्यान भाविकांची गर्दी असते, दरवाज्यात खिळखिळी झालेली दीपमाळ धोकादायक स्थितीत असून, मांडर देवीची सतत आठवण होते. त्यामुळे स्थानिक नागरिक पुन्हा पुरातत्व विभागासमोर आंदोलनाच्या तयारीत आहेत.

Web Title: In Satara, the building of the Khandoba temple is located in a stalking tender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.